सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 1 हजार 394 रुग्ण; 27 जणांचा मृत्यू

Homeमहाराष्ट्रसातारा

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 1 हजार 394 रुग्ण; 27 जणांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1 हजार 394 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

यंदा 50 हजार गोविंदांना मिळणार विमा संरक्षण
पुण्यातून यंदा सव्वा लाख टन द्राक्षांची निर्यात
वारीतील रोकडोबाबा यात्रा चाळीस वर्षानंतर उत्साहात साजरी

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1 हजार 394 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. उपचारादरम्यान 27 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 92 (7862), कराड 252 (23285), खंडाळा 157 (10859), खटाव 74 (16709), कोरेगांव 116 (14982), माण 43 (11856), महाबळेश्‍वर 3 (4102), पाटण 56 (7247), फलटण 212 (27072), सातारा 294 (36524), वाई 81 (11879) व इतर 14 (1102) असे आज अखेर एकूण 1 लाख 73 हजार 479 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 4 (175), कराड 5 (669), खंडाळा 1 (139), खटाव 3 (428), कोरेगांव 3 (331), माण 0 (225), महाबळेश्‍वर 0 (44), पाटण 1 (161), फलटण 2 (260), सातारा 6 (1085), वाई 2 (311) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यात एकूण 3 हजार 828 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना मुक्त झालेल्या 2 हजार 923 रुग्णांना आज डिस्चार्ज

सातारा जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 2 हजार 923 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

COMMENTS