सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 972 रुग्ण; 26 बाधितांचा मृत्यू

Homeमहाराष्ट्रसातारा

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 972 रुग्ण; 26 बाधितांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 972 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 26 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी दिली.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात पोलिस शहीद
दरोडा टाकण्यापूर्वी राहुरीत तीन दरोडेखोरांना अटक
स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये विटा देशात पहिले; कराडची हॅटट्रीक चुकली; पहिल्या दहामध्ये पाचगणीसह कराडचा समावेश

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 972 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 26 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी दिली.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 40 (8174), कराड 154 (25035), खंडाळा 67 (11341), खटाव 139 (18480), कोरेगांव 98 (15886), माण 53 (12498), महाबळेश्‍वर 15 (4197), पाटण 42 (7813), फलटण 80 (27664), सातारा 224 (38411), वाई 46 (12219) व इतर 14 (1210) असे आज अखेर एकूण 1 लाख 82 हजार 928 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 0 (185), कराड 7 (737), खंडाळा 0 (146), खटाव 2 (457), कोरेगांव 3 (365), माण 2 (247), महाबळेश्‍वर 0 (44), पाटण 2 (176), फलटण 1 (274), सातारा 7 (1167), वाई 2 (322) असे आज अखेर जिल्ह्यात एकूण 4 हजार 120 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला.

COMMENTS