सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 830 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.
सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 830 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच उपचारादरम्यान 16 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 19 (8398), कराड 160 (26205), खंडाळा 17 (11554), खटाव 98 (19000), कोरेगांव 82 (16373), माण 87 (12883), महाबळेश्वर 2 (4216), पाटण 59 (8150), फलटण 36 (27997), सातारा 224 (39409), वाई 33 (12439) व इतर 13 (1265) असे आज अखेर एकूण 1 लाख 87 हजार 889 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 1 (189), कराड 1 (767), खंडाळा 0 (147), खटाव 1 (475), कोरेगांव 3 (379), माण 1(253), महाबळेश्वर 0 (44), पाटण 1 (192), फलटण 1 (279), सातारा 5 (1201), वाई 2 (329) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यात एकूण 4 हजार 255 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला.
COMMENTS