Homeमहाराष्ट्रसातारा

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 814 रुग्ण; 25 जणांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 814 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

मेस्मा की नवी नोकरभरती? लवकरच निर्णय घेणार असल्याचा इशारा
Solapur : .अन्यथा सहकार मंत्र्याची गाडी फोडणार (Video)
घरफोडी प्रकरणातील पाच वर्षे फरारी संशयितास अटक

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 814 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच उपचारादरम्यान 25 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी दिली.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 14 (8430), कराड 213 (26684), खंडाळा 47 (11647), खटाव 77 (19131), कोरेगांव 51 (16486), माण 47 (13003), महाबळेश्‍वर 3 (4225), पाटण 66 (8281), फलटण 49 (28123), सातारा 189 (39769), वाई 48 (12519) व इतर 10 (1285) असे आज अखेर एकूण 1 लाख 89 हजार 583 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 2 (191), कराड 10(786), खंडाळा 2 (149), खटाव 1 (478), कोरेगांव 0 (380), माण 2 (255), महाबळेश्‍वर 0 (44), पाटण 0 (193), फलटण 0 (280), सातारा 8 (1218), वाई 0(329) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यात एकूण 4303 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

COMMENTS