सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 371 रुग्ण; तिघांचा मृत्यू

Homeमहाराष्ट्रसातारा

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 371 रुग्ण; तिघांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 371 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

इनरव्हील क्लबकडून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
अवैध पाणी कनेक्शन्स तोडले…मनपा अभियंत्याचे जाहीर कौतुक
राहुरी फॅक्टरी येथे ठाकरे गटाकडून जोडे मारो आंदोलन

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 371 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 278 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोरोना बाधितांच्या अहवालामध्ये : सातारा तालुक्यातील सातारा 21, सदरबझार 4, मंगळवार पेठ 2, शुक्रवार पेठ 1, व्यंकटपुरा पेठ 1, शनिवार पेठ 1, शाहुनगर 2, पंताचा गोट 1, शनिवार पेठ 1, मतकर कॉलनी 11, गडकर आळी 2, देशमुख कॉलनी 1, विकासनगर 3, कोडोली 2, प्रतापगंज पेठ 1, राधिका रोड 1, नागठाणे 1, पिरवाडी 1, खोजेवाडी 1, वर्ये 1, जिहे 1, चिमणगाव 1. कराड तालुक्यातील कराड 3, सोमवार पेठ 2, मलकापूर 3, वाहगाव 3, उंब्रज 1, कोर्टी 1, कवठे 2, लाहोटीनगर मलकापूर 1, खराडे 1, कोयना वसाहत 1. फलटण तालुक्यातील फलटण 6, कसबा पेठ 3, रविवार पेठ 7, मेटकरी गल्ली 2, बुधवार पेठ 2, रंगारी मंदिर 1, आदर्शनगर 1, कोळकी 3, आनंदनगर 2, शाहुनगर 1, गुणवरे 2, पिंप्रद 3, तरडगाव 2, लक्ष्मीनगर 5, मलठण 1, संत बापुदासनगर 2, सोमेश्‍वर 1, कांबळेश्‍वर 2, राजाळे 5, सांगवी 13, सस्तेवाडी 3, मठाचीवाडी 1, धुळदेव 2, शारदानगर कोळकी 1, नरसोबानगर कोळकी 1, पाडेगाव 1, संजगय गांधीनगर 1, भुजबळ मळा 1, दुधेबावी 1, बिरदेवनगर 2, साठेफाटा 1, हणुमंतवाडी 1, सरडे 1, विडणी 1, निंबळक 2, सोमंथळी 1, गोखळी 1, हिंगणगाव 1, फडतरवाडी 1, बोडकेवाडी 1, साखरवाडी 1. माण तालुक्यातील दिवड 1, म्हसवड 1, ढाकणी 1. खंडाळा तालुक्यातील खंडाळा 2, लोण्ंद 6, मोर्वे 2, वाहगाव 2, अहिरे 3, भादे 2, धावडवाडी 1, पारगाव खंडाळा 1, शिरवळ 10. वाई तालुक्यातील दत्तनगर 1, रविवार पेठ 1, गंगापूरी 1, रामढोक आळी 4, जांब 1, मालेदेवाडी 1, शिरगाव 2, पाचवड 1, पांडेवाडी 3, फुलेनगर 2, धोम कॉलनी 1, सोनगिरवाडी 1, बावधन 1, सोनजाईनगर 1, धावली 1. जावली तालुक्यातील भणंग 1. खटाव तालुक्यातील खटाव 1, पुसेगाव 2, वडूज 2, पडळ 1. कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, खेड 2, करंजखोप 2, एकंबे 2, बाबाचीवाडी 1, तांदुळवाडी 1, वाठारस्टेशन 3, भोसे 1, ल्हासुर्णे 1. महाबळेश्‍वर तालुक्यातील पाचगणी 1, पाटण तालुक्यातील पाटण 1, ढेबेवाडी 1, निसरे 1, इतर 5, पाडळी गावठाण 3 तसेच बाहेरील जिल्ह्यातील जालना 6, इस्लामपूर 1, कडेगाव 2, खानापूर 1, वाळवा 1, निरा 1 येथील रुग्णांचा समावेश आहे. 

उपचारादरम्यान 3 बाधित रुग्णांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पीटलमध्ये कलेढोण, ता. खटाव येथील 67 वर्षीय पुरुष, माळेवाडी भुईंज, ता. वाई येथील 42 वर्षीय पुरुष, खोजेवाडी, ता. सातारा येथील 52 वर्षीय पुरुष अशा एकूण 3 बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

COMMENTS