सांगलीत पुरग्रस्तांचा चक्काजाम : पुरबधितांना मदत न मिळाल्याने चक्काजाम: भाजपाच्या नेतृत्वाखाली पुरग्रस्तांनी रोखला राज्य मार्ग: सांगली कोल्हापूर
सांगलीत पुरग्रस्तांचा चक्काजाम :
पुरबधितांना मदत न मिळाल्याने चक्काजाम: भाजपाच्या नेतृत्वाखाली पुरग्रस्तांनी रोखला राज्य मार्ग: सांगली कोल्हापूर मार्गावर केला चक्काजाम: पूरग्रस्तांना तातडीने मदतीची केली मागणी: आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील, पै. पृथ्वीराज पवार, धीरज सुर्यवंशी यांनी केले नेतृत्व सांगलीत पूर मदतीच्या मागणीसाठी पुरग्रस्तांनी चक्काजाम आंदोलन केले. सांगलीच्या पुरबधितांना अद्यापही मदत न मिळाल्याने तसेच अनेकांना तुटपुंजी मदत मिळाल्याने सर्वानी हे चक्काजाम आंदोलन केले.
पुर मदतीसाठी भाजपाच्या नेतृत्वाखाली पुरग्रस्तांनी राज्य मार्ग रोखून धरला. सांगली कोल्हापूर मार्गावर हा चक्काजाम करण्यात आला. यावेळी पूरग्रस्तांना तातडीने मदतीची करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील, भाजपानेते शेखर इनामदार, पै. पृथ्वीराज पवार, धीरज सुर्यवंशी यांनी यांनी या चक्काजाम आंदोलनाचे नेतृत्व केले. या चक्काजाम आंदोलनामुळे काहीकाळ सांगली कोल्हापूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मारत आपल्या मागण्या मांडल्या.
COMMENTS