Homeमहाराष्ट्र

सांगली जिल्ह्यातील द्राक्षांचे कंटेनर अडकले सुएझ कालव्यात

जल वाहतुकसाठी अत्यंत महत्वाचा असा असणारा सुएज कालवा गेल्या चार दिवसांपासून ब्लॉक करण्यात आला आहे.

विरोधी पक्षनेतेपदात रस नाही : अजित पवार
चला हवा येऊ द्या’च्या मंचावर ‘खिलाडी’ अक्षय कुमारचा जबरदस्त परफॉर्मन्स (Video)
शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी

द्राक्षांचे कंटेनर अडकल्याने निर्यातदारांना कोट्यावधीचा फटका

इस्लामपूर / प्रतिनिधी : जल वाहतुकसाठी अत्यंत महत्वाचा असा असणारा सुएज कालवा गेल्या चार दिवसांपासून ब्लॉक करण्यात आला आहे. त्यामुळे समुद्र मार्गे होणार्‍या वाहतूकीची कोंडी झाली आहे. याचा सर्वात मोठा फटका निर्यात केलेल्या द्राक्ष व्यापारांला बसला आहे. द्राक्षांचे शेकडो कंटेनर सुएझ कालव्यात अडकले आहेत, अशी माहिती समोर येत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक आणि सांगली जिल्ह्यातील द्राक्षांच्या कंटेनरचा समावेश आहे. 

इजिप्तचा सुएज कालवा म्हणजे आशिया आणि युरोपला जोडणारा समद्रातील 193.3  किलोमीटर लांबीचा चिंचोळा मार्ग आहे. एवर गिव्हन नावाचे जहाज सुएज कालवा पार करत असताना आलेल्या जोरदार वार्‍यांमुळे नियंत्रण सुटून कालव्यात आडवे झाले. त्यामुळे कालवा ब्लॉक झाला. या जहाजाची लांबी 400 मीटर आणि रुंदी 59 मीटर आहे. जहाज कालव्यात आडवे झाल्याने ते तेथे अडकले आहे. जहाजास धक्का देणार्‍या अनेक टग बोटींचा वापर करून ते सरळ करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, त्याला यश आले नाही. यामुळे कालव्याच्या दोन्ही बाजूला मालवाहतूक करणारी जहाजे अडकून पडली आहेत. 

कालवा ठप्प झाल्याने आफ्रिकेची चक्कर लावून जहाजांना युरोपमध्ये जावे लागेल, असे दिसत आहे. परंतू या मार्गाने द्राक्षांच्या कंटेनरची वाहतूक करणे अत्यंत खर्चिक अशी बाब आहे. तसेच निर्यातदारांना या मार्गाने द्राक्षे घेऊन जाणे शक्य नाही. त्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. 

पुढील चार ते पाच दिवसांत कालव्यातून वाहतूक सुरळीत झाली नाही तर निर्यातदारांना कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार आहे. द्राक्षे उशिराने बाजारात पोहोचली तर त्याला चांगला दर मिळणार नाही. शिवाय द्राक्षे खराब होण्याची भिती आहे. दरम्यान, द्राक्षांचे कंटेनर कालव्यात अडकून पडल्याने उत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे.

COMMENTS