सहकार क्षेत्र संपविण्याच केंद्र सरकारच षडयंत्र… शरद पवारांचा आरोप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहकार क्षेत्र संपविण्याच केंद्र सरकारच षडयंत्र… शरद पवारांचा आरोप

प्रतिनिधी : पुणेसहकारी बँकांवर सदस्य नेमण्याचा अधिकार स्वत:कडे घेण्याच्या हालचाली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुरू केल्या आहेत. त्यावरून राष्ट्रवादी

राष्ट्रवादीचा मोठा निर्णय… ओबीसी आरक्षणाचा निर्णय न झाल्यास…
स्वतःच्या पक्षातील नेत्यांचा गैरकारभार लपवता येत नसल्याने आदळआपट : शेलारांचा पवारांना टोला…
‘सोळा हजारात देखणी’… ‘ही’ लावणी सम्राज्ञी करणार राष्ट्रवादीत प्रवेश…

प्रतिनिधी : पुणे
सहकारी बँकांवर सदस्य नेमण्याचा अधिकार स्वत:कडे घेण्याच्या हालचाली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुरू केल्या आहेत. त्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली आहे.

एखादी व्यक्ती सहकारी संस्थाचा सभासद नसला तरी आम्ही त्याची सहकारी बँकांवर नियुक्ती करणार, असं रिझर्व्ह बँक म्हणत आहे. तो आमचा अधिकार आहे, असं रिझर्व्ह बँकेकडून सांगितलं जात आहे.

खरं तर एका विशिष्ट लोकांच्या हातात सहकारी बँकांची सूत्रे देऊन हळूहळू सहकार क्षेत्र आणखी दुबळे करण्याचं आणि संपवण्याचं केंद्र सरकारचं षडयंत्र असल्याचा आरोप असा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला.

शरद पवार म्हणाले, हा निर्णय सर्व सहकाराच्या विरोधात आहे. सामान्य माणसाच्या अर्थकारणाच्या दृष्टीनेही हा घातक प्रकार आहे. आज रिझर्व्ह बँकेचा सहकारी बँकांकडे बघण्याचा दृष्टीकोण योग्य नाही.

सहकारी बँका कुणाच्या हातात द्यायची हा सभासदांचा अधिकार आहे. कोण संचालक असावा हे सभासद ठरवतात. ज्याची कामगिरी चांगली नसेल त्याला पुढच्या निवडणुकीत बाजूला केलं जातं.

पण आता रिझर्व्ह बँक म्हणते आम्हीच सहकारी बँकांवर सदस्य नेमणार. म्हणजे एखादा व्यक्ती सहकारी संस्थाचा सभासद नसला तरी आम्ही त्याची सहकारी बँकांवर नियुक्ती करणार, असं रिझर्व्ह बँक म्हणत आहे.

तो आमचा अधिकार आहे, असं आरबीआयकडून सांगितलं जात आहे. खरं तर एका विशिष्ट लोकांच्या हातात सहकारी बँकांची सूत्रे देऊन हळूहळू सहकार आणखी दुबळे करण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप त्यांनी केला.

COMMENTS