सहकाराचे ग्रहण थांबवावेच लागेल!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

सहकाराचे ग्रहण थांबवावेच लागेल!

महात्मा गांधीच्या खेड्याकडे चला या शब्दांच्या मतितार्थांचा खराखुरा विकास करण्यासाठी पद्मश्री विठ्ठलराव विखे,धनंजय गाडगीळ,वैकुंठभाई मेहता,नंतरच्या काळ

कार वरील ताबा सुटल्याने कार आणि चालक थेट नाल्यात.
…तर, नगर अर्बनच्या प्रशासकांना काळे फासणार ; अर्बन बचाव कृती समिती आक्रमक पवित्र्यात
Beed : गेवराईत दोन दुकानांना आग लागून लाखोंचे नुकसान

महात्मा गांधीच्या खेड्याकडे चला या शब्दांच्या मतितार्थांचा खराखुरा विकास करण्यासाठी पद्मश्री विठ्ठलराव विखे,धनंजय गाडगीळ,वैकुंठभाई मेहता,नंतरच्या काळात दत्ता देशमुख, भाऊसाहेब थोरात आदी विभूतींनी सहकाराला चालना देत कारखानदारीच्या माध्यमातून ग्रामिण अर्थव्यवस्थेला नवा आयाम दिला.आज ही पिढी काळाच्या पडद्याआड झाली.काहींची दुसरी किंवा तिसरी  पिढी सहकाराची सिडी वापरून राजकारणात पाय रोवून असली तरी सहकाराचा खेळखंडोबा या पिढीला मात्र थांबवता आला नाही.ग्रामिण अर्थव्यवस्थेचा हा कणा मोडून पडू लागल्याने या सहकार विभूतींचे परिश्रम आणि महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत घडविण्याचा मनसूबाही धुळीस मिळाला आहे.

सहकाराच्या  माध्यमातून परीसराचा विकास व्हावा त्या अनुषंगाने राज्यातील ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकाराच्या माध्यमातून  प्रगती साधावी यासाठी तब्बल दोन पिढ्या खपल्या आहेत.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खेड्याकडे चला हा मंत्र देणारे महात्मा गांधी यांनी ग्रामिण भारताच्या विकासाचे स्वप्न पाहीले होते.खरा भारत खेड्यात आहे,भारताचा विकास करायचा असेल तर खेड्यांचा विकास करणे अपरिहार्य आहे. खेडे विकासाची ही पार्श्वभूमी असलेला खेड्याकडे चला या  मुलमंत्राला पुरक ठरणारी सहकार चळवळ स्वातंत्रोत्तर भारतात चांगलीच फोफावली.खरे तर सहकार क्षेत्राची पायाभरणी करणाऱ्या विभूतींनी स्वातंत्र्याआधीपासून या मुलमंत्राला बळ दिले.महात्मा गांधीच्या खेड्याकडे चला या शब्दांच्या मतितार्थांचा खराखुरा विकास करण्यासाठी पद्मश्री विठ्ठलराव विखे,धनंजय गाडगीळ,वैकुंठभाई मेहता,नंतरच्या काळात काॕ.दत्ता देशमुख,भाऊसाहेब थोरात आदी विभूतींनी सहकाराला चालना देत कारखानदारीच्या माध्यमातून ग्रामिण अर्थव्यवस्थेला नवा आयाम दिला.
उत्पादक शेतकऱ्यांना मालक बनृविणारी सहकारी साखर कारखानदारी,दुध उत्पादक संस्था,खरेदी विक्री सहकारी संस्था,सहकारी बँका,सुक्ष्म अर्थकारणासाठी पतसंस्थांचे जाळे उभारून ग्रामिण भारताची स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी केली,अनेक जाणकार नेते सहकारात सक्रिय झाले, , गावोगावी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांची स्थापना करून ग्रामीण भागातील लोकांना कर्ज उपलब्ध करुन दिली जाऊ लागली होती. याच सोसायटींच्या माध्यमातून  मदत घेत , तालुका व जिल्हास्तरावर सहकारी तत्त्वावर आधारित साखर कारखाने सुरू करण्यासाठी भाग भांडवल जमा करण्यात आले, त्यासाठी सहकार महर्षी विठ्ठल राव विखे-पाटील , धनंजय गाडगीळ ,व्यंकटभाइ  मेहता , यशवंतराव चव्हाण , वसंत दादा पाटील ,भाऊसाहेब थोरात .दत्ता देशमुख  आदींनी उपाशी पोटी पोटाला चिमटा काढत रानोमाळ फिरत भागभांडवल जमा करून सहकार तत्वावर आधारित कारखाने सुरू केले ,त्या आधी काही ठिकाणी खाजगी उद्योग पतींनी शेतकऱ्यांच्या जमिनी खंडाने घेऊन त्या जागेवर कारखाने उभे केले होते , त्यासाठी लागणारा कच्चा माल (उस) उपलब्ध व्हावा म्हणून अतिशय अल्प दराने हजारों एकर जमिनी  महसूल विभागाच्या मदतीने अल्पशा दरात खंडाने घेऊन तेथे उस लागवड केली जात होती , पुढे त्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनी ताब्यात घेऊन त्या शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यासाठी या मंडळींनी प्रयत्न करत त्यांच्याकडे असलेल्या कारखान्यांचे सहकारी साखर कारखान्यात रूपांतर करून सभासदांच्या नावावर कारखाने सुरू केले.साधारण पणे  तिन-चार दशके , सहकार चळवळीच्या माध्यमातून  ग्रामिन भागाचा कायापालट झाला हे जरी खरे असले तरी ,एकविसाव्या शतकात मात्र सहकाराला घरघर लागली. पहिल्या पाच,दहा वर्षांत अनेक सहकारी संस्था, साखर कारखाने,सुतगिररण्या बंद पडल्या.सहकाराचा पाया घालणारी  ही पिढी काळाच्या पडद्याआड झाली.काहींची दुसरी किंवा तिसरी  पिढी सहकाराची सिडी वापरून राजकारणात पाय रोवून असली तरी सहकाराचा खेळखंडोबा या पिढीला मात्र थांबवता आला नाही.ग्रामिण अर्थव्यवस्थेचा हा कणा मोडून पडू लागल्याने या सहकार विभूतींचे परिश्रम आणि महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत घडविण्याचा मनसूबाही धुळीस मिळाला आहे., कर्जाच्या खाईत सापडलेली ही चळवळ वाकली आहे.कर्जाच्या वसुलीसाठी महाराष्ट्र राज्य शिखरं बॅंके ने दहा वर्षापूर्वी  ५० कारखाने विकुन खाजगी उद्योग पतीच्या घशात घातले आहेत , त्यामुळे त्यावर अवलंबुन असलेले सर्वच घटक  विकासापासुन वंचीत राहीले , हाजारो कामगार देशोधडीला लागले ,कर्ज बाजारी झालेले किमान १०० कारखान्याची वसुली पोटी विक्री न करता ते काही काळासाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यात यावेत,असा एक मतप्रवाह आता पुढे येऊ लागला आहे.कारखाना कवडीमोल भावात भांडवलदार राजकारण्याःच्या घशात जाण्यापेक्षा शेतकऱ्यांचा थेट संबंध असलेल्या सहकारी संस्थांना भाडेतत्वावर चालविण्यास देण्याचा आग्रह सहकार चळवळ वाचविण्याचा हेतू साध्य करू शकतो,नाशिक जिल्ह्यातील  रानवड साखर कारखाना अशाच एका संस्थेने चालविण्यास घेऊन या परंपरेची सुरूवात केली आहे.नाशिक सहकारी साखर कारखानाही बाजार समिती चालविण्यास घेण्यासाठी  प्रयत्नशील आहे.या प्रयत्नांना खीळ न घालता पाठबळ द्यायला हवे अन्यथा येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही.

COMMENTS