सर्व शिक्षकांनी लसीचे दोन डोस पूर्ण करा : अजित पवार; शाळा सुरू करण्याचा निर्णय टास्क फोर्ससोबत चर्चा करून घेणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्व शिक्षकांनी लसीचे दोन डोस पूर्ण करा : अजित पवार; शाळा सुरू करण्याचा निर्णय टास्क फोर्ससोबत चर्चा करून घेणार

मुंबई : देशातील अनेक राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्रात शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार संभ्रमावस्थेत असल्याच

जन आशीर्वाद यात्रेमुळे कोरोना वाढणार : अजित पवारांची टीका
बुलडाण्यात टिप्पर उलटून 13 मजुरांचा मृत्यू l DAINIK LOKMNTHAN*
जरंडेश्वरचे भूत कुणाच्या मानगुटीवर बसणार ?

मुंबई : देशातील अनेक राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्रात शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय टास्क फोर्ससोबत चर्चा करून घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सर्व शिक्षकांनी लसीचे दोन डोस पूर्ण करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.
आपला पाल्य ज्या शाळेत जातोय त्या शिक्षकांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यास पालकांना दिलासा मिळेल, असेही अजित पवार म्हणाले. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार आहेत. मात्र केंद्राकडून गर्दी करणारे उत्सव घरगुती पध्दतीने साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या मात्र काही दिवसातच विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले होते. शिवाय तिसर्या लाटेत सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आणि दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागत आहे त्यामुळे केंद्रसरकारच्या आरोग्य विभागाने राज्याला काही सूचना केल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मराठवाडयात झालेल्या अतिवृष्टीबाबत जिल्हाधिकार्‍यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय त्या-त्या जिल्हयाचे पालकमंत्री घटनास्थळी पोचले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना दिली. मराठवाडयात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. शिवाय जमीनी खरवडून निघाल्या आहेत. तर काही भागात घाट कोसळून वाहतूक ठप्पही झाली होती. याबाबत कालच कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्या-त्या जिल्हयाचे जिल्हाधिकारी या सगळ्या नुकसानीची पाहणी करत आहेत, असेही अजित पवार यांनी सांगितले.

शिक्षकांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम
राज्य सरकार लवकरच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत असून, त्यासाठी शिक्षकांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र सरकार विशेष मोहीम राबवणार आहे. 5 तारखेपर्यंत शिक्षकांचे डबल लसीकरण करण्याबाबत स्पेशल ड्राईव्ह घेणार आहेत. राज्यातील काही जिल्हे आणि शाळा जिथे पॉझिटिव्ह रुग्ण नाहीत त्या बाबत टास्क फोर्सचा शाळा आणि जिल्हे सुरू करण्याबत विचार सुरु आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांचे लसीकरण करुन घेणे आवश्यक असल्याने यासंदर्भात राज्य सरकारकडून पावले टाकण्यात येत आहेत.

COMMENTS