सर्वसामान्यांनाही उपलब्ध होणार वेंटिलेटर मशीन; हेळगाव येथील युवकाच्या प्रयत्नाला यश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वसामान्यांनाही उपलब्ध होणार वेंटिलेटर मशीन; हेळगाव येथील युवकाच्या प्रयत्नाला यश

कोरोनाच्या महामारीमध्ये अत्यवस्थ असणार्‍या रुग्णांना व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत. सध्या ही एक मोठी समस्या निर्माण झाली असून, यामुळे अनेकांना जीव ही गमवावा लागत आहे.

जिल्ह्यात केडगाव पोस्ट ऑफिस अव्वल
वांबोरी घाटात दोघांना मारहाण करून लुटले
कराडच्या प्रशासकीय इमारतीत कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्यांना प्रवेश बंद


मसूर / प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीमध्ये अत्यवस्थ असणार्‍या रुग्णांना व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत. सध्या ही एक मोठी समस्या निर्माण झाली असून, यामुळे अनेकांना जीव ही गमवावा लागत आहे. यावर काहीतरी उपाय योजना आपण करावी या उदात्त भावनेतून कोरणा रुग्णांना उपयोगी ठरेल असे मिनी व्हेंटिलेटर मशीन विकसित करण्यात पुण्यात कामानिमित्त असणार्‍या हेळगावच्या युवकाला यश मिळाले आहे. 

कराड तालुक्यातील हेळगाव येथील युवा उद्योजक सुनील बाबर यांनी निखिल इंडस्ट्रीच्या माध्यमातून संपूर्ण भारतीय बनावटीचे व्हेंटिलेटर मशीन तयार केले आहे. त्यांनी बनवलेल्या मिनी व्हेंटिलेटरला आता चांगलीच मागणी वाढू लागली आहे. जास्तीत-जास्त व्हेंटिलेटर मिशन बनवून कोरोनाच्या महामारीत व्यवसायाच्या माध्यमातून अल्पदरात सर्वसामान्यांना आणि छोट्या-मोठ्या दवाखान्यांना उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.             

अत्यवस्थ अवस्थेतील कोरूना रुग्णांना जीवदान देऊ शकेल, असे हे मिनी वेंटीलेटर मशीन आहे. सध्या अनेक रुग्णांना वेळेवर वेंटीलेटर मशीन उपलब्ध होत नसल्याने आपला जीव गमवावा लागत आहे. परदेशी बनावटीच्या वेंटीलेटरच्या किमतीही भरमसाट आहेत. मात्र, पुण्यात निखिल इंजीनियरिंग आणि यशका इनकोट्रॉनिक्स या दोन कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्णपणे भारतीय बनावटीचे मिनी व्हेंटिलेटर तयार करण्यात आले आहे. परदेशी कंपनीपेक्षा या वेंटीलेटरची किंमत ही अतिशय कमी आहे.

या मिनी व्हेंटिलेटर मशीनचे सर्व मेकॅनिकल व बॉडी तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम निखिल इंजिनिअरिंग यांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स जोडणी यशका इन्फोट्रान्किक्स यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या मशीनला महाराष्ट्रासह परराज्यातून मागणी वाढत असल्याचे निखिल इंजिनीरिंगचे प्रमुख सुनील बाबर यांनी दैनिक लोकमंथनला माहिती दिली.

गेल्या मार्चमध्ये भारतात कोरोनाची सुरुवात झाली. त्यावेळेपासून आज अखेर संपूर्ण देशात व्हेंटिलेटर मशीनची कमतरता जाणवू लागली आहे. या समस्येवर मात करण्याच्या दृष्टीने निखिल इंजिनिअरिंगचे सुनील बाबर व यशका इन्फो ट्रॉनिक्स यांनी संयुक्तपणे हा प्रयोग हाती घेतला होता. त्यानंतर सहा महिन्यातच त्यांच्या प्रयत्नांना यश आले. भारतीय बनावटीचे व कमी किमतीचे मिनी वेंटिलेटर मशीन बनवण्यात ते यशस्वी झाले. सुरुवातीला चाचणी घेऊन पुण्यातच विविध हॉस्पिटल्सना मशीनचा पुरवठा करण्यात आला. कमी किमतीत आधुनिकतेची जोड असणारे मिनी वेंटिलेटर मशीन रुग्णांना खूपच फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आल्याने या मशीनला मागणी वाढली आहे. तसेच करुणा महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सध्या अनेक जणांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. अनेक उद्योग व्यवसाय बंद पडलेले असताना निखिल इंजिनिअरिंग आणि यशका इनकोट्रॉनिक्स या दोन कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना काम उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्याबद्दल ही या दोन्ही कंपन्यांच्या कामाचे कौतुक होताना दिसत आहे.

 हेळगावकरांना अभिमानास्पद गोष्ट … 

कराड तालुक्याच्या उत्तरेकडील टोकावर असलेल्या हेळगाव येथील अनेकजण आज विविध क्षेत्रात आपले नाव उज्वल करून गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम करत आहेत. अशाच प्रकारे गेले वर्षभर सुरू असलेल्या कोरूनाच्या महामारीत कोवीड रुग्णांसाठी मिनी व्हेंटीलेटर तयार करून सुनील बाबर यांनी हेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. निश्‍चितच ही बाब हेळगावकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. हेळगाव येथील ग्रामस्थांनी सुनील बाबर यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोवीड रुग्णांना किफायतशीर …

पूर्णपणे भारतीय बनावटीचे हे मिनी वेंटिलेटर मशीन असून याला चार पर्टिक्युलर मोड आहे. कोवीड रुग्णांना ज्या प्रमाणात  ऑक्सीजन पाहिजे त्या पध्दतीने हे मशीन बनवण्यात आले आहे. हाताळणीसाठी ही सुलभ असल्याने हे मिनी वेंटिलेटर मशीन  रुग्णांना फायदेशीर ठरत असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS