मुंबई : मी पक्षाअंतर्गत बैठकीसाठी चालले आहे. मी दिल्लीला दर 15 दिवसांनी जात असते. माझी भूमिका अशी आहे की, आम्ही ज्या भूमिकेमध्ये आपण आहोत त्याचे
मुंबई : मी पक्षाअंतर्गत बैठकीसाठी चालले आहे. मी दिल्लीला दर 15 दिवसांनी जात असते. माझी भूमिका अशी आहे की, आम्ही ज्या भूमिकेमध्ये आपण आहोत त्याचे सक्षमपणे करायला हवे. आणि आम्ही ते काम करत आहोत. आपण आता जनतेसाठी काम करावे. सरकार पडतंय की राहत हा गौण विषय आहे, असे मत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. दिल्लीला बैठकीसाठी जाण्यापूर्वी त्या आज रविवारी, दि. 17 रोजी माध्यमांशी बोलत होत्या.
मुंडे म्हणाल्या, की मी आजारी असल्याने मराठवाडा दौर्याला मी नव्हते. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना देखील माहीत आहे. राज्यात मी ज्या व्यासपीठावर आवश्यकता आहे तिथे मी असते. शरद पवारांचे (डहरीरव झरुरी) वक्तव्य मी ऐकले नाही, असे त्यांनी सांगितले. मी मोठी नेता नाही. मोठ्या नेत्यांकडून लहान नेत्यांनी शिकायचे असते. पवार साहेब आम्हाला शिकवतील, असे त्या म्हणाल्या.
COMMENTS