बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यामधल्या तढेगावानजीक समृद्धी महामार्गाच्या कामावरील डंपरचा भीषण अपघात झाला. या अपघातात 13 मजूरांच

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यामधल्या तढेगावानजीक समृद्धी महामार्गाच्या कामावरील डंपरचा भीषण अपघात झाला. या अपघातात 13 मजूरांचा जागीच मृत्यू झाला असून 3 मजूर जखमी आहेत. लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या या डंपरमधून 16 मजूर प्रवास करत होते.
यासंदर्भातील माहितीनुसार सिंदखेडराजा तालुक्यातील तढेगाव जवळ परिवहन मंडळाच्या बसला साईड देताना समृद्धी महामार्गाच्या कामावरील डंपर रस्त्याच्या कडेला उलटून झालेल्या अपघातात 13 मजूरांचा मृत्यू झाला तर 3 मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
COMMENTS