समुद्र किनारी जिल्ह्यातील 12 हजार 420 नागरिकांचे स्थलांतरण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समुद्र किनारी जिल्ह्यातील 12 हजार 420 नागरिकांचे स्थलांतरण

"ताऊक्ते" चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे. 

चोरट्यांनी थेट फ्लिपकार्टच्या कार्यालयावर मारला डल्ला , पाहा नेमक काय नेलं ! | LOK News 24
कोतुळमध्ये पोलिस दलाचे पथ संचलन
‘लसीकरण उत्सव’ म्हणजेच कोरोनाविरूध्दच्या दुसऱ्या मोठ्या लढाईचा प्रारंभ : पंतप्रधान

मुंबई : “ताऊक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील 8 हजार 380 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. ताऊक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.

COMMENTS