समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ ; जात पडताळणी समितीकडे तक्रार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ ; जात पडताळणी समितीकडे तक्रार

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावर सुरु असलेला गोंधळ अजूनही संपण्याची चिन्हे नस

नगर अर्बन बँकेला चुकते करावे लागणार डिपॉझीट गॅरंटीचे पैसे
Solapur : ना.सतेज पाटलानी घेतला विविध विभागाचा आढावा (Video)
विमा संरक्षण क्षेत्राची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु ः कृषिमंत्री धनजंय मुंडे

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावर सुरु असलेला गोंधळ अजूनही संपण्याची चिन्हे नसून, याविरोधात काही संघटनांनी जात पडताळणी समितीकडे वानखेडे यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची चौकशी करण्याची मागणी केल्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
वानखेडेंविरोधात भीम आर्मी, स्वाभिमानी रिपब्लिकन संघटनेची जात पडताळणी समितीकडे तक्रार करण्यात आली आहे. समीर वानखेडेंविरोधात भीम आर्मी, स्वाभिमानी रिपब्लिकन संघटनेची जात पडताळणी समितीकडे तक्रार करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांनी खोटा जातीचा दाखला देऊन नोकरी मिळवल्याचा या दोन्ही संघटनांकडून आरोप करण्यात आला आहे. नवाब मालिक यांनीही समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा केला आहे. याची मुंबई जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार करण्यात आल्याचे भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी सांगितले.
वानखेडे यांची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पाठराखण केली होती. तसेच वानखेडे कुटुंबियांनी आठवले यांची भेट घेऊन आम्ही आंबेडकरवादी अनुयायी असल्याचा दावा केला होता. परंतु परंतु एवढया दिवसात हे कुंटूंब कधी हिंदू म्हणत होते. आता ते आंबेडकरवादी असल्याचे सांगत आहेत. ते आंबेडकरवादी आहेत हा खोटा अपप्रचार कदापि आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा भीम आर्मी भारत एकता मिशनचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिला आहे.
केंद्रीयमंञी रामदास आठवले यांचा आंबेडकरी समाज सन्मान करतो. परंतु त्यांनी समीर वानखेडे यांना पाठीशी घालू नये, असेही कांबळे म्हणाले. समीर वानखेडे हे आंबेडकरीवादी असते तर त्यांनी आंबेडकरी चळवळीत योगदान दिल्याचे अन्यथा आंबेडकरीवादी असल्याचा एखाद्या पुरावा सोशल मिडीयावर सादर करावा, असे आव्हान भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी बोलताना केले आहे. समीर वानखेडे हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वरुडतोफा गावचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांचा शाळा सोडल्याचा दाखला समोर आला असून अकोल्यातील न्यू इरा हायस्कूलमध्ये ते शिकत होते. त्यावर ज्ञानदेव कचरूजी वानखेडे, असे त्यांचे नाव लिहिलेले दिसतेय. तसेच त्यांच्या जात प्रमाणपत्रावर देखील अनुसूचित जातीचा उल्लेख केला आहे. यासोबतच त्यांचे नातेवाईक अरविंद दीपक वानखेडे आणि दीपक लक्ष्मण वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र देखील समोर आले आहेत.

COMMENTS