कृष्णा कारखान्याची सत्ता सभासदानी संस्थापक पॅनेलकडे द्यावी, सभासदांना प्रतिशेअरला दरमहा सात किलो म्हणजेच वर्षाला 84 किलो मोफत साखर देवू, असे आश्वासन संस्थापक पॅनेलचे नेते अविनाश मोहिते यांनी किल्ले मच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथे कारखाना निवडणुकीसाठी झालेल्या प्रचार सभेत बोलताना दिले.
इस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याची सत्ता सभासदानी संस्थापक पॅनेलकडे द्यावी, सभासदांना प्रतिशेअरला दरमहा सात किलो म्हणजेच वर्षाला 84 किलो मोफत साखर देवू, असे आश्वासन संस्थापक पॅनेलचे नेते अविनाश मोहिते यांनी किल्ले मच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथे कारखाना निवडणुकीसाठी झालेल्या प्रचार सभेत बोलताना दिले.
मोहिते म्हणाले, सभासदांना मोफत साखर दिली तरी आपल्या मागील सत्तासत्राप्रमाणे ऊसास एफआरपीपेक्षा जादा दर देण्याची तसेच कामगारांना वेळेत पगार देण्याची परंपरा कायम राखली जाईल. डॉ. सुरेश भोसले यांनी राजकिय सुडबुध्दीपोटी कामावरून कमी केलेल्या कामगारांना न्याय दिला जाईल. सध्या कामावर असणार्या कोणाही कामगारास कामावरून कमी केले जाणार नाही. कामगाराना साडेबारा टक्के बोनस दिला जाईल.
कपोस्ट खत निर्मिती प्रकल्पामुळे परीसरात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाय योजना केली जाईल. नागरीकांना स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविले जाईल. शासन आणि कारखान्याच्या समन्वयातून कारखाना कार्यक्षेत्रात क्षारपड जमीन सुधारणा करून शेतकर्यांच्या एकरी उत्पन्न वाढीस चालना दिली जाईल. कृष्णा आणि जयवंत शुगरची समान प्रतीची साखर एकाच व्यापार्यास विकताना दीडशे रुपयाचा फरक आहे. यावरून कारखाना चांगला चालविण्याचा डांगोरा पिटणारे डॉ. सुरेश भोसले आर्थिक अपहार करत असल्याचे स्पष्ट होते. त्यांच्या या गोलमाल व्यवहाराचे पुरावे आपल्याकडे असल्याचे अविनाश मोहिते म्हणाले.
यावेळी अजितआप्पा चिखलीकर, राहुल निकम, तानाजी यादव, अजित साळुंखे, सचिन कदम यांची भाषणे झाली.
ईडीमार्फत तपास व्हायला हवा…
वीस एकरादरम्यान जमीन असलेल्या डॉ. भोसले यांनी सात हजार कोटीची कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टची मिळकत कशी निर्माण केली. याचा तपास ईडीमार्फत व्हायला हवा. असे सांगून भोसले यांना समोर पराभव दिसू लागल्याने त्यांनी एका मतास तीन हजार रुपयाचा दर काढला आहे. आता जर पैसे घेऊन मतदान केले तर पुढील पाच वर्षे एकरी सात हजार रुपये ऊस तोडीसाठी द्यावे लागतील. कारखान्याचे खासगीकरण होईल. हे लक्षात घेऊन सभासदांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन मोहिते यांनी केले.
COMMENTS