सप्टेंबर महिन्यापासून मिळू शकते लहान मुलांना लस ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सप्टेंबर महिन्यापासून मिळू शकते लहान मुलांना लस ?

नवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लहान मुलांचे देखील लसीकरण करण्यासाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचे लहान

देशात परिवर्तनाची सुरूवात ः शरद पवार
मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पात मोठा घोटाळा; मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पावर शेलारांचा गंभीर आरोप
धोकादायक इमारती पाडण्यास सुरुवात

नवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लहान मुलांचे देखील लसीकरण करण्यासाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचे लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. याबाबत सप्टेंबरपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान मुलांना सप्टेंबरपासून लस देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच ट्रायल ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात पूर्ण होईल. दुसरीकडे फायझरच्या व्हॅक्सिनला अमेरिकेत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे सप्टेंबरपासून मुलांचे लसीकरण सुरु होईल, अशी आशा आहे, असे एम्सचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं. येणार्‍या काही आठवड्यात लसीचे डोस उपलब्ध झाले पाहीजेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरु केल्या पाहीजेत. यामुळे मुलांना अधिक सुरक्षा मिळेल आणि पालकांनाही आपली मुलं सुरक्षित असल्याचा दिलासा मिळेल. असं डॉ गुलेरिया यांनी सांगितले. देशात आतापर्यंत 18 वर्षांवरील 42 कोटीहून अधिक लोकांना करोना लसीचा किमान एक डोस दिला गेला आहे. आतापर्यंत देशातील 6 टक्के लोकांना करोना लस देण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. यासाठी दिवसाला 1 कोटी लस देणं गरजेचं आहे. मात्र सध्या 40 ते 50 लाख करोनाचे डोस दिले जात आहेत. तर आठवड्याच्या शेवटी लसीकरण मोहीम थंडावत असल्याचं दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी करोनाचा प्रभाव काही कमी झालेला नाही. त्यामुळे तिसर्‍या लाटेचे संकट कायम आहे. तिसर्‍या लाटेत लहान मुलांवर सर्वाधिक प्रभाव पडेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने लसीकरणावर जोर दिला आहे.

COMMENTS