सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्यातून शिर्डी येथे जिल्हा पर्यटन माहिती केंद्र सुरू होणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्यातून शिर्डी येथे जिल्हा पर्यटन माहिती केंद्र सुरू होणार

शिर्डी (प्रतिनिधी)- श्रद्धा व सबुरी चा मंत्र देणारे श्री साईबाबा देवस्थान हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठे तीर्थक्षेत्र आहे. येथे देशभरातू

देशभक्तीची ज्योत कायम तेवत ठेवा : महेश बनकर
ऑक्सिजनचा सिलेंडर फुटल्याने मोठा स्फोट, 82 जणांचा होरपळून मृत्यू | सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24
सावेडीतून महिलेच्या गळ्यातील गंठण धूम स्टाईलने पळवले

शिर्डी (प्रतिनिधी)- श्रद्धा व सबुरी चा मंत्र देणारे श्री साईबाबा देवस्थान हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठे तीर्थक्षेत्र आहे. येथे देशभरातून लाखो भाविक येत असतात. शिर्डीसह अहमदनगर जिल्ह्यात विविध तीर्थक्षेत्रे व नैसर्गिक, ऐतिहासिक असे पर्यटन स्थळे असून यांची अद्यावत माहिती बाहेरून आलेल्या भाविकांना व पर्यटकांना मिळावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून आता शिर्डीत पर्यटक माहिती केंद्र सुरू होणार आहे..

 याबाबत अधिक माहिती अशी की, शिर्डीत दरवर्षी देशातून व परदेशातूनही लाखो भाविक येत असतात .त्यातील अनेक जण शिर्डी व तर काही जण जास्तीत जास्त शनिशिंगणापुर करून परत जातात. अहमदनगर जिल्हा विस्ताराने मोठा असून ऐतिहासिक जिल्हा आहे. या जिल्ह्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले व निसर्ग समृद्धीने नटलेल्या भंडारदरा धरण, निळवंडे धरण, रंधा धबधबा, अम्ब्रेला फॉल ,कळसूबाई शिखर, रतनवाडी,सानंददरी, अहमदनगर शहरातील भुईकोट किल्ला, चांदबिबीचा महल, नेवासे येथील संत ज्ञानेश्वरांचे मंदिर, देवगड, सिद्धीटेक, यांचं सह हिवरेबाजार राळेगणसिद्धी असे पर्यटन व धार्मिक स्थळे आहेत.

 या सर्व पर्यटन व निसर्ग स्थळांची माहिती बाहेरून आलेल्या भाविकांना व पर्यटकांना मिळाली तर त्यांनाही हे वैभव पाहता येणार आहे. त्याचबरोबर  जिल्ह्यातील पर्यटन स्थळाला ही मोठी चालना मिळणार आहे . त्यातून रोजगार निर्मिती वाढून त्या ठिकाणच्या ग्रामीण आर्थिक व्यवस्थेला  मजबुती मिळणार आहे म्हणून शिर्डी येथे पर्यटनाची माहिती देणारे आद्यवत पर्यटन माहिती केंद्र सुरू व्हावे यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पर्यटन मंत्री नामदार आदित्य ठाकरे यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला. या मागणीला नामदार आदित्य ठाकरे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला शिर्डी येथे पर्यटन माहिती केंद्र सुरू करून त्या ठिकाणी 2 व्यक्तींची कायमस्वरूपी नेमणूक करण्याच्या सूचना केल्या आहेत .

शिर्डी येथे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व पोलीस प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या अद्ययावत व सुसज्ज पोलिस चौकीमध्ये हे माहिती केंद्र सुरू होणार आहे. या निर्णयामुळे अहमदनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पर्यटनाला चालना मिळणार असून तरुणांनाही रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे..

COMMENTS