सत्ताधारी सत्तेवर आल्यास हाही कारखाना खाजगी होईल : डॉ. इंद्रजित मोहिते

Homeमहाराष्ट्रसातारा

सत्ताधारी सत्तेवर आल्यास हाही कारखाना खाजगी होईल : डॉ. इंद्रजित मोहिते

यशवंतराव मोहिते यांनी समाजहिताचे अनेक निर्णय घेतले. कृष्णा कारखान्याची स्थापना हा त्या निर्णयातील दूरदृष्टीचा निर्णय होता.

कर्जतमधील अपघातात तिघांचा मृत्यू
चकलांबा येथील विद्यार्थ्यांसाठी नविन विशेष बस सुरु
महाराष्ट्र काँग्रेस मधील गटबाजी पुन्हा उघड


कराड / प्रतिनिधी : यशवंतराव मोहिते यांनी समाजहिताचे अनेक निर्णय घेतले. कृष्णा कारखान्याची स्थापना हा त्या निर्णयातील दूरदृष्टीचा निर्णय होता. त्याबरोबर त्यांनी कृषी पूरक व शिक्षण संस्थांना मंजूरी दिली. परंतू दुर्दैवाने काही स्वार्थी मंडळींनी भाऊंच्या विचार व तत्वांना सुरुंग लावून त्या संस्था खाजगी केल्या. हीच मंडळी कृष्णा कारखान्याकडे वक्रदृष्टी ठेवून पाहत आहेत. ते सत्तेवर आल्यास हाही कारखाना खाजगी होईल. यामुळे पुढील पिढीचे अतोनात नुकसान होईल. याची काळजी करण्याची वेळ आली आहे. सभासदांनी सावध राहून कृष्णा कारखाना खाजगीकरणाचा डाव हाणून पाडावा, असे प्रतिपादन यशवंतराव मोहिते रयत पॅनेलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते यांनी केले.

वनवासमाची व हजारमाची (ता. कराड) येथील प्रचार दौर्‍यात ते बोलत होते. सुहास जगताप, रघुनाथ डुबल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. मोहिते म्हणाले, सत्ताधारी मंडळी सभासद विकासाच्या खोट्या वल्गना करत आहेत. माझ्या चेअरमन पदाच्या काळात सात नवीन प्रकल्प उभे राहिले. त्यातून सभासदांच्या विकासाला चालना मिळाली. कारखान्याच्या कार्यस्थळावर आणखी नवे प्रकल्प उभारण्याचे नियोजन आखले होते. सुमारे 80 कोटी रुपयांची शिल्लक कारखान्याकडे होती. 

आमच्या सभासद हिताच्या कारभाराला कुटील डाव रचून दृष्ट लावली गेली. त्यानंतर सत्तेत आलेल्या संचालक मंडळाचा कारभार सर्वांना माहित आहे. त्यानंतर कारखाना तोट्यात आला. गेल्या सहा वर्षातील कारभार त्यापेक्षा वेगळा नाही. सभासदांनी आपले संसार सुखरूप राखण्यासाठी रयत पॅनेलला एकतर्फी निवडून द्यावे. आम्ही सभासदांचा सर्वांगीण विकास करू. 

यावेळी डॉ. मोहिते यांनी सभासदांच्या प्रत्यक्ष भेटी घेत रयत पॅनेलचा जाहीरनामा दिला. व रयत पॅनेलला भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

COMMENTS