सणांवरच निर्बंध का ? – राज ठाकरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सणांवरच निर्बंध का ? – राज ठाकरे

मुंबई : सण आला की लॉकडाऊन, म्हणजे सणांमधून रोगराई पसरते. मात्र यांच्या जन आशीर्वाद यात्रा, मेळावे, हाणामाऱ्यांमधून पसरत नाही. मैदानांमध्ये क्रिकेट, फ

आत्महत्या करून डाव अर्धवट सोडू नका-राज ठाकरे | LokNews24
खडसेंना संपविण्यासाठी ईडीची कारवाई : राज ठाकरे
राज ठाकरे याचं छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य l LokNews24

मुंबई : सण आला की लॉकडाऊन, म्हणजे सणांमधून रोगराई पसरते. मात्र यांच्या जन आशीर्वाद यात्रा, मेळावे, हाणामाऱ्यांमधून पसरत नाही. मैदानांमध्ये क्रिकेट, फुटबॉल खेळत आहेत. महापौर बंगल्याजवळ सरकारकडून कामं करून घेण्यासाठी येणाऱ्या बिल्डरांच्या गाड्या काही कमी झालेल्या नाहीत. मग सणांवरच का निर्बंध येतात ?, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे.

केवळ सणांमधून रोगराई पसरते का?

ठाकरे म्हणाले की, सर्व गोष्टी चालूच आहे की. नारायण राणेंच्या विरोधात जे झालं, यांच्या हाणामाऱ्या सुरू आहेत. बाकीच्या सगळ्यांचे मेळावे सुरू आहेत. भास्कर जाधव यांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला. म्हणजे यांच्यासाठी मंदिरं सुरू, बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही. कुठूनही गर्दी कमी झालेली दिसत आहे का? यांनी मेळावे, सभा घ्यायच्या पण आम्ही दहीडंही साजरी करायची नाही. तेव्हा तुमचा लॉकडाऊन नाही. सण आला की लॉकडाऊन, म्हणजे सणांमधून रोगराई पसरते. हवंय तेवढं वापरायचं आणि जनतेला घाबरवायचं असं सुरू आहे.

हल्लेखोर फेरीवाला सुटला की मार खाईल

ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर सोमवारी सायंकाळी फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला केला. यावर ठाकरे म्हणाले की, पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमच्याकडून तो मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सगळी बोटं छाटली जातील आणि यांना फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही ना, त्या दिवशी यांना कळेल. हिंमत कशी होते यांची. निषेध करून ही लोक सुधरणारी नाहीत. आम्ही हे वारंवार सांगत होतो. यांची हिंमत ठेचलीच पाहिजे. महाराष्ट्रातील शासकीय अधिकाऱ्याची बोट छाटली जातात? आज पकडले गेलेत उद्या जामीन होईल आणि परत हे बाहेर दुसऱ्यांची बोट तोडायला, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

COMMENTS