२६ जून रोजी बाबुजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयमध्ये सकारात्मक व्यक्तिमत्व विकास (Development of Positive Personality) या विषयावर अहमदनगर महाविद्यालय, अहमदनगर येथील प्रा चंद्रकांत उकिरडे यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
पाथर्डी (प्रतिनिधी) :

या प्रसंगी बोलताना प्रा उकिरडे यांनी नकारात्मक विचार बाजूला सारून सकारात्मक विचाराने विद्यार्थ्याची प्रगती होऊ शकते. तसेच विद्यार्थ्यांनी आपले ध्येय शालेय जीवनात ठरवून त्या दृष्टिकोनातून वाटचाल केली पाहिजे योग, प्राणायाम, ध्यानधारणा, छंद यामधून व्यक्तीचा सकारात्मक विकास हा होत असतो असे प्रतिपादन केले. या प्रसंगी बाबुजी आव्हाड महाविद्यालया चे प्राचार्य डॉ जी. पी. ढाकणे, पर्यवेक्षक प्रा शेखर ससाणे, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
कार्यक्रमा चे प्रास्ताविक व आयोजन प्रा मन्सूर शेख यांनी तर आभार प्रा सलीम शेख यांनी मांडले.
COMMENTS