संयम संपला; आता गृहीत धरू नका ; खासदार संभाजीराजे यांचा इशारा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संयम संपला; आता गृहीत धरू नका ; खासदार संभाजीराजे यांचा इशारा

आत्तापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला. हो आहे मी संयमी; पण इथून पुढे तुम्ही माझा संयम पाहणार नाहीत. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.

सावेडी येथील सय्यद पीर बाबांच्या मजारवर जाण्यासाठी रस्ता खुला करुन द्यावा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला शिवसैनिकांनी दिला चोप l LOKNews24
देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा उत्साहात

किल्ले रायगड/प्रतिनिधीः आत्तापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला. हो आहे मी संयमी; पण इथून पुढे तुम्ही माझा संयम पाहणार नाहीत. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. मराठा समाजाला गृहीत धरू नका, असा इशारा देतानाच खासदार संभाजीराजे यांनी 16 तारखेला पहिला मोर्चा कोल्हापुरात काढणार असल्याचे जाहीर केले.  

    शिवराज्याभिषेक दिनापर्यंत मराठा आरक्षणाविषयी सरकारने ठोस भूमिका घेतली नाही, तर आम्ही भूमिका जाहीर करू, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे आज शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर संभाजीराजे रायगडावरून काय भूमिका जाहीर करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यानुसार रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमानंतर संभाजीराजांनी आपली भूमिका मांडली. पहिल्या टप्प्यात लोकप्रतिनिधींची जबाबदारी असून सामान्य माराठा जनतेने रस्त्यावर येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळापासून पहिला मोर्चा काढणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. खासदार लोकसभेचा पगार घेतात, आमदार विधानसभेचा पगार घेतात. तुमची जबाबदारी आहे ती; पण कुठलाही आमदार पुढे आलेला नाही. तुमची काय जबाबदारी आहे यावर बोला. आत्ताच्या सरकारला हात जोडून विनंती केली; पण तरी काही फरक पडत नाही. यापुढे तुम्ही माझा संयम बघूच शकणार नाही. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल, असा इशारा देऊन संभाजीराजे म्हणाले, की ताकदच पाहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. लोकप्रतिनिधींनी सांगायला हवे, की सकल मराठा समाजाला तुम्ही कसा न्याय देणार आहात. तेव्हाच बोलायचे. कोविड संपल्यानंतरदेखील तु्म्ही ठोस पावले उचलली नाहीत, तर संभाजीराजांसह संपूर्ण मराठा समाज मुंबईपर्यंत लाँग मार्च करणार. तिथे तुम्हाला लाठी मारायची असेल, तर पहिली लाठी संभाजीराजेंना मारावी लागेल. छत्रपतींच्या वंशजावर पहिली लाठी मारावी लागेल.

लाँगमार्च काढणार

कोरोनाचे संकट ओसरल्यानंतरदेखील पावले उचलली गेली नाहीत, तर लाँगमार्च काढला जाईल, यामध्ये लाखो लोक सहभागी होतील, असा इशारा संभाजीराजे यांनी या वेळी दिला. 2007 पासून मी महाराष्ट्र पिंजून काढला. ज्या सुखाने बहुजन समाज नांदत होता, मराठा समाज नांदत होता, तो आज का नाही, म्हणून मी मराठा समाजासाठी बाहेर पडलो. किती आंदोलने केली; पण सर्वोच्च न्यायालयाने सांगितले, की मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही. तो एसईबीसीमध्ये येऊ शकत नाही. म्हणून समाजाला मिळालेले आरक्षण काढून घेण्यात आले. त्यामुळे सगळे समाजाचे लोक दु:खी झाले, असे ते म्हणाले.

आजी, माजी सत्ताधीशांबाबत संताप

माझा लढा 70 टक्के गरीब मराठ्यांसाठी आहे. मागच्या सरकारचे लोक म्हणाले, ’आत्ताच्या सरकारने मांडणी बरोबर केली नाही. आत्ताचे सरकार म्हणते, तुम्ही कायदा बरोबर केला नाही.’ मी मोठा, की तू मोठा, हेच चालले आहे. आमची मागणी एकच आहे, आम्हाला न्याय द्या. कोण चुकले त्याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी आपला संताप व्यक्त केला.

COMMENTS