संत भगवान बाबांचे विचार समाजाला प्रेरणादायी – आ. संग्राम जगताप

Homeताज्या बातम्याशहरं

संत भगवान बाबांचे विचार समाजाला प्रेरणादायी – आ. संग्राम जगताप

अहमदनगर प्रतिनिधी- संत भगवान बाबा यांच्या विचाराने आम्ही प्रेरित होऊन समाजाचे प्रश्न सोडवीत आहे. संत भगवान बाबा हे एका समाजापुरते मर्यादित नसून स

अहमदनगर शहर दहशतमुक्त करण्याचा महात्मा गांधी जयंतीदिनी संकल्प
खरीप पिके झाली उध्दवस्त, शासनाने भरपाई द्यावी
दहापेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असलेली कर्जत तालुक्यातील गावे राहणार ८ दिवसांसाठी बंद

अहमदनगर प्रतिनिधी-

संत भगवान बाबा यांच्या विचाराने आम्ही प्रेरित होऊन समाजाचे प्रश्न सोडवीत आहे. संत भगवान बाबा हे एका समाजापुरते मर्यादित नसून सर्व समाजाला त्यांचे विचार प्रेरणादायी आहे.आजच्या युवकांनी त्यांचे विचार आत्मसात करावे.राष्ट्रसंत भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक,नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले.

भक्तिमार्ग,कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता.कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद,अज्ञान,अंधश्रद्धा,अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी महाराष्ट्रासह विविध राज्य पिंजून काढत समाज प्रबोधन केले.तसेच समता,बंधुता, एकता,मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते कष्टकरी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्यागले असे प्रतिनिधी आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

            सारस नगर येथे संत भगवान बाबा नगर प्रवेशद्वाराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी समवेत उद्योजक लिंबाशेठ नागरगोजे,नगरसेवक प्रकाश भागानगरे,झुंबर आव्हाड,गणेश आनंदकर,बबन घुले,संतोष ढाकणे,ओंकार घोलप, कृष्णा भानानगरे,सतिष ढाकणे,रामदास पाखरे,सुनील पोकळे,कमाल जायभाय,अलिशा गर्जे आदी उपस्थित होते.

        यावेळी बोलताना नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले की, सारसनगर भागांमध्ये संत भगवान बाबा नगरची निर्माण झाली तेव्हा या ठिकाणी कुठल्याही विकासाच्या सुविधा नव्हत्या परंतु आ.अरुणकाका जगताप व आ.संग्राम जगताप यांच्या माध्यमातून या भागाचा विकासातून कायापालट झाला तसेच आध्यात्मिक व धार्मिक त्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी संत भगवान बाबा यांचे भव्य-दिव्य मंदिर या ठिकाणी उभे केले आज भगवान बाबांच्या नावाचा प्रवेशद्वार तयार केला आहे. भविष्यामध्ये आ.संग्राम जगताप यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी मी कटिबद्ध राहील असे ते म्हणाले.

COMMENTS