संजय राऊतांना अटक करा… पुण्यात भाजपचे पदाधिकारी झाले आक्रमक…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊतांना अटक करा… पुण्यात भाजपचे पदाधिकारी झाले आक्रमक…

प्रतिनिधी : पुणेसंजय राऊत यांनी कोथळा बाहेर काढू असे वक्तव्य केले . ही एक धमकी असून कोथळा बाहेर काढण्याचे वक्तव्य आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही. त्य

साऊ एकल महिला समितीची अकोल्यात स्थापना
शक्तीशाली भूकंपाने एकाचवेळी तीन देश हादरले
आदित्य ठाकरेंना मंत्री केलं तेव्हाच शिंदेना पोटदुखी – किशोरी पेडणेकर 

प्रतिनिधी : पुणे
संजय राऊत यांनी कोथळा बाहेर काढू असे वक्तव्य केले . ही एक धमकी असून कोथळा बाहेर काढण्याचे वक्तव्य आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी मुळीक यांनी केली .

राऊत यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना पुण्यात फिरू देणार नाही, असा इशाराही दिला आहे. डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये शहर भाजपाच्या वतीने तक्रार अर्ज देण्यात आला आहे.

यावर विधी विभागाचा सल्ला घेऊन योग्य ती कार्यवाही करू अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी यावेळी दिली .

गेल्या काही दिवसांपासून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे . चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करत आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप केला होता .

पाटील यांच्या टीकेला राऊत यांनी उत्तर दिले. आम्ही समोरून कोथळा काढतो मागून नाही. पाठीमागून वार करण्याची शिवसेनेची परंपरा नाही,असे संजय राऊत म्हणाले होते. यावरून भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला .

संजय राऊत वादग्रस्त वक्तव्य करून राजकारण करतात असतात . निवडणूक लढविण्याची हिंमतदेखील त्यांच्यात नाही .कोथळा बाहेर काढू ही एक प्रकारे धमकी आहे. ती आम्ही खपवून घेणार नाही.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अटक झाली होती. त्यामुळे राऊत यांनादेखील अटक करावी”. जर गुन्हा दाखल केला नाही तर राज्यभरात आंदोलन केले जाईल , असा इशाराही मुळीक यांनी दिला .

COMMENTS