प्रतिनिधी : पुणेपुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा बोलबाला होता. शिवसेनेचे नेते शिवाज
प्रतिनिधी : पुणे
पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा बोलबाला होता. शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे सलग तीनदा शिरूरमधून खासदार म्हणून निवडून आले.
मात्र २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी धूळ चारली. त्यामुळे शिवसेनेत कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुण्याची जबाबदारी घेतल्याचे दिसत आहे.
संजय राऊत हे दोन दिवस पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मात्र या दोनच दिवसांत त्यांनी शिवसेनेला नवचैतन्य दिल्याचे दिसून आले. या दोन दिवसांत राष्ट्रवादीसह भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
४ सप्टेंबर रोजी खेड येथे झालेल्या मेळाव्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन बांधून प्रवेश केला. तर याच दिवशी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम उरकून घेतला.
शिवसेनेकडे बहुमत असूनही खेड नगरपरिषदेतील सत्ता राष्ट्रवादीने आपल्याकडे खेचल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. मात्र आता शिवसेनेने राष्ट्रवादीच्या करेक्ट कार्यक्रमांना सुरुवात केली आहे.
आज खेडमधील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला गळाला लावून शिवसेनेने त्याला शिवबंधनात अडकवले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी शिवसेनेचे नेते रामदास कदम खास मुंबईहून खेडला आले होते.
COMMENTS