शिवसेनेच्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला जातो तेव्हा संजय राऊत यांच वक्तव्य येत नाही.
मुंबई : शिवसेनेच्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला जातो तेव्हा संजय राऊत यांच वक्तव्य येत नाही. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरुन संजय राऊत यांचे कोणतेही वक्तव्य समोर आले नाही, कदाचित त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असावं. शिवसेनेच्या नेत्यांची पाठराखण करायला विसर पडलेले संजय राऊत मात्र अनिल देशमुखांच्या चौकशीसाठी राजीनाम्याची आवश्यकता नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसची भलामण, पाठराखण करीत आहेत, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी पुढे आली. या मुद्द्यावर उत्तर देताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी राजीनाम्याची आवश्यकता नाही, अशी पाठराखण केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना दरेकर म्हणाले संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून केलं आहे का, अशा प्रकारची शंका निश्चितपणे निर्माण होते.
COMMENTS