संचारबंदी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख उतरले रस्त्यावर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संचारबंदी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख उतरले रस्त्यावर

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी आज जिल्हाधिकारी डॉ.

गौतमी पाटील व्हायरल व्हिडिओची चौकशी करा  – महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणाकर
चापोरा किल्ला
राठोड क्षत्रिय समाज ट्रस्टच्या अध्यक्षपदी विक्रम राठोड

अहमदनगर: जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी आज जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील हेच रस्त्यावर उतरले. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना त्यांनी चांगलेच खडसावले. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखायचा असेल तर सर्वांनी नियमांचे पालन करावेच लागेल. आज कुटुंबच्या कुटुंब बाधित होताना दिसत आहेत. अशावेळी नियमांचे पालन करा, असे आवाहन त्यांनी केले. आज बहुतांश जिल्हावासीयांनी या जनता कर्फ्यूला पाठिंबा दिल्याचे चित्र दिसून आले. जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पाटील यांनी त्याबद्दल सर्व जिल्हावासीयांचे आभार मानले आणि असाच प्रतिसाद कायम ठेवा, आपण निश्चितपणे ही साखळी तोडू, असा विश्वास व्यक्त केला. शनिवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कोरोनाविषयक उपाययोजनांचा आढावा घेतला होता. यावेळी जिल्ह्यात १४ दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले होते. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी त्यानंतर लगेचच काही अत्यावश्यक सेवांच्या वेळातही बदल  करण्याचे आदेशजारी केले होते आणि तात्काळ त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली होती. आज जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नगर शहराच्या काही भागात प्रत्यक्ष भेटी देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे की नाही याची पाहणी केली. विनाकारण रस्त्याने फिरणाऱ्.या नागरिकांना तसेच वाहनचालकांना त्यांनी चांगलेच फटकारले. स्वताचे आणि कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात आणू नका, कोरोना संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरु नका, अशा शब्दांत त्यांनी नागरिकांना फटकारले. अगदी अत्यावश्यक काम असेल तरच नियमांचे पालन करुन घराबाहेर पडा. अन्यथा घरातच थांबा, असे आवाहन त्यांनी केले. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी आणि दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी नागरिकांनीविनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. आज बहुतांश जिल्हावासियांनी जसे सहकार्य केले तसेच सर्व नागरिकांनी त्यासाठी सहकार्य केले पाहिजे. आरोग्य यंत्रणांवर पडणारा ताण कमी होण्याची गरज आहे. संसर्गाची साखळी तुटली तर हा ताण कमी होऊ शकतो, अशा शब्दात जिल्हाधिकारी डॉ. भोसले  आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

COMMENTS