Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संकटात धावून आलेल्या निशिकांतदादांना साथ द्या : सुनीता भोसले-पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : गेल्या पाच वर्षांचा काळ आठवा. कोरोना असो, महापूर असो, सगळ्या संकटात निशिकांत भोसले-पाटील हे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे

पाठीत खंजीर खुपसण्याचे शिवाजीराव नाईक यांचे काम : राहुल महाडीक
विशेष रस्ता अनुदानाच्या 11 कोटीला नगरविकासची स्थगिती; इस्लामपूरात श्रेयवादाचे राजकारण पेटले
पर्यटन मंत्र्यांचा प्रतापगडावरून कडेलोट करण्याची गरज : आ. शशिकांत शिंदे

इस्लामपूर / प्रतिनिधी : गेल्या पाच वर्षांचा काळ आठवा. कोरोना असो, महापूर असो, सगळ्या संकटात निशिकांत भोसले-पाटील हे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. ते पाच वर्षे राबले, मी काय करू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. आता आपली जबाबदारी आहे, त्यांना पाच वर्षे संधी देण्याची. त्यामुळे महिलांनी आपल्या भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी इस्लामपूर विधानसभा मतदार संघात परिवर्तन घडवून निशिकांतदादांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून देऊन विधानसभेत पाठवावे, असे आवाहन सुनीता निशिकांत भोसले-पाटील यांनी केले.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रचारार्थ बैठकीत त्या बोलत होत्या. दरम्यान, त्यांनी साखराळे, हुबालवाडी, खरातवाडी, बहे, नरसिंहपूर, कोळे, शिरटे येथे मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या व संवाद साधला. यावेळी तैसीन आत्तार, सुरेखा जगताप प्रमुख उपस्थित होत्या.
सुनीता भोसले-पाटील म्हणाल्या, गेल्या निवडणुकीत पराभूत झाले तरीही निशिकांतदादा दुसर्‍या दिवशी कामाला लागले. केवळ त्यांनी पक्ष संघटन वाढवले नाही तर ते प्रत्येक माणसाच्या संकट काळात धावून आले. महापुरातील त्यांचे काम कृष्णाकाठचा माणूस कधीच विसरू शकणार नाही. विद्यमान आमदारांना तुम्ही 35 वर्षे संधी दिली. पण मतदार संघाच्या बाहेरचा आमदार करून तुम्हाला काय मिळाले. तुम्ही ज्यांना साहेब म्हणतात ते आपल्याशी कुटुंब प्रमुख म्हणून वागतात का?
महायुती सरकारने जनतेवर योजनांचा पाऊस पाडला आहे. एसटी पासून ते दवाखान्यापर्यंत, लाडकी बहीण ते शालेय शिक्षणापर्यंत, मोफत राशन अशा सर्वच गोष्टीमध्ये लोकांना लाभ होत आहे. महाविकास आघाडीचे सरकार होते तेंव्हा तुम्हाला 50 रुपये तरी मिळाले का? म्हणून हे महायुती सरकार पुन्हा येण्यासाठी आपण सर्वांनी आत्मचिंतन करून बदल घडवा व निशिकांतदादांना विधानसभेत पाठवा.
यावेळी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

COMMENTS