शेतक-यांनी जिवाणू खतांचा वापर वाढवावा : कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतक-यांनी जिवाणू खतांचा वापर वाढवावा : कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी  जिवाणू खतांना सेंद्रीय शेतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्व आहे. जिवाणू खतांमुळे पिकांची उगवण क्षमता वाढते, पिकांची भरघोस वा

राहुरी कृषि विद्यापीठाच्या तीन पुस्तकांचे दिल्लीच्या कार्यक्रमात विमोचन
ज्वारी सुधार प्रकल्पाचे कार्य उल्लेखनीय : कुलगुरु डॉ.पाटील
कृषि विद्यापीठाचे कुलगुरु पाटील गोपालकाच्या भेटीला

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

जिवाणू खतांना सेंद्रीय शेतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्व आहे. जिवाणू खतांमुळे पिकांची उगवण क्षमता वाढते, पिकांची भरघोस वाढ होते आणि उत्पन्नामध्ये 10 ते 12 टक्क्यांनी वाढ होते तसेच रासायनिक खतांची 20 ते 25 टक्यापर्यत बचत हाते. या खतांच्या वापरामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मामध्ये सुधारणा होते. या करिता जिवाणू खतांचा वापर शेतक-यांनी वाढवावा असे आवाहन कुलगुरु डॉ. पी. जी.  पाटील यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठा अंतर्गत वनस्पती रोगशास्त्र व कृषि अणुजीवशास्त्र विभागत जिवाणू खते उत्पादन प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पास महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगूरु डॉ. पी. जी.  पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या बरोबर विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, वनस्पती रोगशास्त्र व कृषि अणुजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. तानाजी नरुटे , प्रकल्प प्रमुख डॉ. आण्णासाहेब नवले, डॉ संजय कोळसे उपस्थित होते.

यावेळी  संशोधन संचालक डॉ. शरद गडाख म्हणाले की दिवसेंदिवस रासायनिक खते वापरुन जमिनीचा सामू वाढला असुन जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यासाठी जैविक खते त्यावर उत्तम उपाय असुन त्याच्या वापरामुळे जमिनीच्या सर्व गुणधर्मामध्ये सुधारणा होते. महात्मा फुले कृषि विद्यापीठ पुर्वीपासून गुणवत्ता पुर्वक जैविक खतांची निर्मिती करत असुन   शेतक-यांनी जास्तीत जास्त जैविक खतांचा वापर केला पाहिजे. 

ही जैविक खते पावडर व द्रवरुप स्वरुपात उपलब्ध असुन विद्यापीठाचे विक्री केंद्र आणि वनस्पती रोगशास्त्र विभाग, मफुकृवि., राहुरी तसेच विद्यापीठाचे कार्यक्षेत्रातील 10 जिल्हयात 28 विक्री केंद्रांवर उपलब्ध आहे. विद्यापीठाची ही जैविक खते दर्जेदार असुन शेतक-यांमध्ये अधिक लोकप्रिय होत आहेत त्यामुळे विक्रीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. नत्र स्थिरीकरण जिवाणू, रायझोबियम, अझोटोबॅक्टर, असेटोबॅक्टर तसेच स्फुरद  विरघळणारे जिवाणू (पीएसबी), पालाश विरघळणारे जिवाणू (केएसबी), जैविक रोग नियंत्रक ट्रायकोडर्मा आणि कंपोस्ट कल्चर इत्यादी घटकांची निर्मिती या प्रकल्पामधून केली जाते.

COMMENTS