शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा…

पुणे प्रतिनिधी शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. सतत सगळा त्रास सहन करून तो अन्नधान्य पिकवतो, सर्वांना जगवतो. मात्र राजकीय सोडा पोटी त्या शेतकऱ्याला गा

हिरो मोटोकॉर्पवर ईडीची कारवाई
नगरमधील अंध दिव्यांग वापरणार…चक्क स्मार्ट मोबाईल
एन्काउंटर व्यवस्थेचा की प्रवृत्तीचा ?

पुणे प्रतिनिधी

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. सतत सगळा त्रास सहन करून तो अन्नधान्य पिकवतो, सर्वांना जगवतो. मात्र राजकीय सोडा पोटी त्या शेतकऱ्याला गाडीखाली ‘चिरडून मारले’ जात आहे. इतकी हिंसक वृत्ती नेत्यामध्ये कशी जन्माला आली. कारण याअगोदर सुद्धा हिटलरने चिमणीत घालून ज्यु लोकांना मारले होते. त्याच हुकूमशहा ची पुनरावृत्ती आपल्या भारतात होत आहे. हिटलर शाही आपण खपवून घ्यायची नाही म्हणून शेतकऱ्यांच्या पोरांनी आपला ‘दबावगट’ निर्माण केला पाहिजे… यासाठी सर्व तरुणांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र आलं पाहिजे असे मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक श्री. संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी नरसंहार सुरू आहे. केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेतल्यामुळे व शेतकरीविरोधी काळे कायदे देशात लागू केल्यामुळे केंद्र सरकारवर शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहे. मोदी सरकार भांडवलदारांचे (अदानी, अंबानीचे) सरकार असल्यामुळे भांडवलदारांच्या हिताचे निर्णय केंद्र सरकार घेत आहे. केंद्रीय कृषिमंत्र्यांना शेतकऱ्यांची दुःख दिसत नाहीत. दिल्लीत वर्षभर चालणाऱ्या आंदोलनाची दखल घेत घेत नाही याचा अर्थ केंद्र सरकारची ही रानटी प्रवृत्ती आहे. या विरोधात उद्या देशव्यापी बंदला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा आहे. 

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आणि महासचिव सौरभ खेडेकर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी संभाजी ब्रिगेड बंद मध्ये सहभागी होणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी संभाजी ब्रिगेड आजपर्यंत नेहमी संघर्ष करत आलेली आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ… संभाजी ब्रिगेड मैदानात आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यां विरोधात मंजूर केलेले कृषी कायदे आणि कामगार कायदे हे शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याची सुपारी केंद्र सरकारने घेतलेली आहे. यामुळे शेतकरी आणि कामगार उध्वस्त  होणार असून सरकारने याकडे वेळीच गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. शेतकऱ्याच्या संघर्षाचा वणवा पेटत आहे. केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन उध्वस्त होणाऱ्या शेतकरी, शेतमजूर, कामगार यांना बळ देण्याचं काम करावं आणि काळे कायदे तात्काळ पाठीमागे घ्यावेत. शेतकऱ्यांच्या झालेल्या अटकेच्या निषेधार्थ सोमवारच्या ‘महाराष्ट्र बंद’ ला संभाजी ब्रिगेडचा पुणे-सातारा सह महाराष्ट्र बंदला जाहीर पाठिंबा आहे…

COMMENTS