शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेकापचे अर्धनग्न आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेकापचे अर्धनग्न आंदोलन

बीड (प्रतिनिधी) बीड येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली 8  ऑक्टोबर रोजी जिल्ह

Beed : गेवराई मध्ये निघाला सर्वपक्षीय संताप मोर्चा (Video)
मी ज्या भागात घडलो तेथे माझा सन्मान होत आहे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे -: डॉ.गणेश चंदनशिवे
Beed : बीड जिल्ह्यासह केज तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी

बीड (प्रतिनिधी)

बीड येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली 8  ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर  अर्धनग्न धरणे आंदोलन करण्यात आले,

राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात शेकापच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली राज्य सरकार आणि केंद्र सरकार दिवसेन दिवस शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेऊन शेतकऱ्यांना एक प्रकारे आर्थिक दृष्ट्या कमकुवत करण्याचे काम राज्य केंद्र सरकार करत असल्याचा आरोप  कार्यकर्त्यांनी केला या आंदोलनातील प्रमुख मागण्या

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट हे. 50 हजार रुपये तात्काळ  मदत करा,एफ आर पी चे तीन तुकडे न करता उसाची एफआरपी एक रक्कमी 14 दिवसाच्या आत द्या,

2020 मधील पिक विमा तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करा. बीड जिल्ह्यातील पाझर तलाव नदीकाठच्या पूरग्रस्त भागातील गावांचे पुनर्वसन करा, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज व शेतीपंपाचे दोन वर्षांचे विज बील माफ करा. या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते भाई  मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालया समोर 11अक्टोबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले होते 

या वेळी अॅड नारायण गोले पाटील अॅड संग्राम तुपे भाई अर्जुन सोनवणे भाई भीमराव कुटे नाना पावार, जिं डी देशमुख  नवनाथ जाधव अमोल सावंत प्रशांत चाटे मुंजाबा पंचाळ बलभीम भगत गणेश कदम सुदाम चव्हाण विलास मुंडे बालू इतापे मुकुंद शिंदे रईस शेख मुकुंद खेत्री आंनत चव्हाण विष्णू इतर शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते 

मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले मागण्या पुर्ण न झाल्यास शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उग्र सोरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

COMMENTS