कोल्हापूर : शेतकर्यांना एफआरपी देण्याबाबत कोणतेही सरकार असले तरी आखडता हात घेण्याचे धोरण दिसते. मोदी सरकारला एफआरपी एकरकमी न देता ती तोडून द्यायची आ
कोल्हापूर : शेतकर्यांना एफआरपी देण्याबाबत कोणतेही सरकार असले तरी आखडता हात घेण्याचे धोरण दिसते. मोदी सरकारला एफआरपी एकरकमी न देता ती तोडून द्यायची आहे. याबाबत शरद पवार यांचे मोदी सरकारशी एकमत आहे. शेतकर्यांना टोपी घालायची म्हटले की हे दोन्ही नेते एकत्र होतात, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे उद्या ऊस परिषद होत आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी राजू शेट्टी शेतकर्यांच्या बैठका घेत आहेत. यापैकी आजरा येथील बैठकीत ते बोलत होते. शरद पवारांना साखर कारखान्यांच्या कर्जाची काळजी आहे. पण शेतकर्यांनी घेतलेल्या कर्जाची काळजी नाही. साखर कारखान्यांचे कर्ज फेडता आले नाही तर कारखाने अवसायनात काढण्यात येतात पण शेतकर्याला कर्ज फेडायचे भेटता आले नाही तर शेतकर्यांनी काय करायचे याची चिंता पवारांना नाही. एफआरपी एकरकमी देता येणार नाही असे पवार सांगतात. पण कारखाने विकताना रकमा रकमा एकरकमी घेतात, अशा शेलक्या शब्दात राजू शेट्टी यांनी पवारांचा समाचार घेतला. जयसिंगपूर मधल्या उद्याच्या ऊस परिषदेला शेतकर्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सरकार कोणतेही असले तरी शेतकर्यांच्या हिताच्या विरोधात काम करत असेल तर शेतकर्यांचा मोठा दबावगट तयार झाला पाहिजे असे आग्रही प्रतिपादन देखील त्यांनी केले.
COMMENTS