शेतकर्‍यांच्या आंदोलनाला आता ममतांची साथ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांच्या आंदोलनाला आता ममतांची साथ

कोरोनाची दुसरी लाट ओसरत आलेली असताना या आंदोलनाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रयत्नदेखील शेतकरी आंदोलकांकडून केले जात आहेत.

प्रकल्प पूर्ण करून सिंचन क्षमता वाढवावी
रेल्वेत प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या चोर महिलेला अटक | LOK News 24
दिल्लीत पाणीबाणी; भाजपाकडून ‘आप’ विरोधात आंदोलन

कोलकाता: कोरोनाची दुसरी लाट ओसरत आलेली असताना या आंदोलनाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रयत्नदेखील शेतकरी आंदोलकांकडून केले जात आहेत. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी आज पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकात्यामध्ये भेट घेतली. या बैठकीत त्यांनी ममता यांच्याशी शेती आणि स्थानिक शेतकर्‍यांबाबत चर्चा केली. या वेळी ममता यांनी म्हटले, की एकीकडे उद्योगांचे हाल होत असून दुसरीकडे औषधांवरदेखील जीएसटी लावला जात आहे. गेल्या सात महिन्यांपासून केंद्र सरकारने शेतकर्‍यांशी बोलण्याची तसदी घेतली नाही. मी अशी मागणी करते, की हे तीनही कृषी कायदे त्वरित रद्द करण्यात यावेत.

    या वेळी टिकैत यांनी म्हटले, की ममता यांनी आम्हाला आश्‍वस्त केले आहे. त्या म्हणाल्या आहेत, की त्यांचा या शेतकरी आंदोलनाला असलेला पाठिंबा कायम आहे. पश्‍चिम बंगाल एक मॉडेल स्टेट म्हणून काम करेल आणि शेतकर्‍यांना अधिकाधिक फायदा करवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील. शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. या आंदोलनात आतापर्यंत पाचशेहून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात किसान एकता मोर्चाच्या ट्विटरवर म्हटले आहे, की शेतकरी आंदोलनाचे सहा महिने पूर्ण करणे तितकेसे सोपे नव्हते. मोदी सरकारच्या अहंकारी आणि निर्दयी वागणुकीमुळे या आंदोलनात आतापर्यंत पाचशेहून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे; मात्र हे आंदोलक शेतकरी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत ठामपणे उभे राहितील. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी पंजाब आणि हरयाणा या राज्यांमध्ये ट्रॅक्टर रॅली काढून सरकारविरोधातील शेतकर्‍यांच्या या मागणीला कृतीशील पाठिंबा दाखवला आहे. ते सातत्याने शेतकर्‍यांची बाजू मांडत असतात. याच संदर्भात आता राहुल यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा शेतकर्‍यांना आपला पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटले, की शेती आणि देशाच्या सुरक्षेसाठी शेतकर्‍यांनी सातत्याने आपले प्राण गमावले आहेत; मात्र शेतकरी घाबरले नाहीत. ते आजही तितक्याच ठामपणे उभे आहेत.

COMMENTS