शेतकरी लाचार रहावा म्हणून राज्यकर्ते प्रयत्नशील : राजु शेट्टी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी लाचार रहावा म्हणून राज्यकर्ते प्रयत्नशील : राजु शेट्टी

जामखेड प्रतिनिधी  राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, उडीद, कांदा कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. ते पाहण्यासाठी केंद्र व राज

कर्मवीर बहुजनांच्या शिक्षणाचे आधारवड ः आ.आशुतोष काळे
सहकर पॅनलचे जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल
कोपरगाव तालुक्यात महात्मा दिन उत्साहात साजरा

जामखेड प्रतिनिधी 

राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, उडीद, कांदा कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. ते पाहण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला वेळ नाही. त्यावरील लक्ष हटविण्यासाठी वेगवेगळे छापे व धाडीचे नाटक चालू आहे. यातून किती संपत्ती मिळाली हे कधीच कळत नाही. राज्यकर्ते हे शेतकरी लाचार रहावा, गरीब रहावा म्हणून सतत प्रयत्नशील असतात शेतकरी सक्षम झाला तर त्यांची दुकानदारी बंद होईल अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची “जागर एफआरपीचा आराधना शक्तीपीठाची” ही यात्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांच्या कार्यालयासमोर आली होती. यावेळी माजी खासदार शेट्टी यांचे स्वागत करून वाजत गाजत बैलगाडीतून मिरवणुकीने मान्यवर सभास्थळी पोहचले. या प्रसंगी वस्रोउद्योग महामंळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेचे प्रदेश समन्वयक डॉ. प्रकाश पोपळे, जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, जिल्हसंघटक अॅड.ऋषीकेश डुचे, संघटना प्रमुख हनुमान उगले, जनार्धन भोंडवे, शहरध्यक्ष भाऊसाहेब डोके, शहर उपध्यक्ष नितीन जगताप, राहुल पवार आदीं उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना माजी खासदार शेट्टी म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळावी यासाठी संसदेत २०१८ साली कायदा करण्यात आला.  ऊस तोडणीनंतर १४ दिवसांत रक्कम देणे बंधनकारक आहे. उशीर झाल्यास १५ टक्के व्याज आकारण्याचा कायदा असूनही कारखाने शेतकऱ्यांना वेळेत पैसे देत नाहीत. आता तर हा कायदा बदलून नवीन कायदा स्वीकारण्याचे शासनकर्त्यांचे धोरण आहे. याबाबत राज्य सरकारने त्यास सहमती दर्शवली आहे. केंद्र व राज्य सरकार ऊस उत्पादक शेतकरी विरोधी धोरणांचे पुरस्कर्ते आहेत.

सदर कायदा रोखण्यासाठी व राज्यकर्त्यांना सुबुद्धी मिळावी म्हणून आपण जागर एफआरपीचा आराधना शक्तिपीठाची ही यात्रा सुरू केली आहे. यात्रेची सांगता विजयादशमीच्या दिवशी सातारा जिल्ह्यातील फलटण येथे करणार आहोत. वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष तुपकर म्हणाले, राज्यकर्ते हे पांढर्‍या कपड्यातील दरोडेखोर आहेत. या दरोडेखोरांना धडा शिकवण्यासाठी माजी खासदार शेट्टीना साथ देणे आवश्यक आहे. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश आजबे यांनी तर आभार अँड. ऋषीकेश डुचे यांनी मानले.

COMMENTS