शेतकरी बापाला न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांचे २७ सप्टेंबरला आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी बापाला न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांचे २७ सप्टेंबरला आंदोलन

बीड (प्रतिनिधी ) कृषिप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशामध्ये शेतकरी आज  हलाखीच्या परिस्थितीत जिवन जगत आहे 11 हजार रुपये क्विंटल न जा

ओगलेवाडी येथे रेल्वे स्टेशनजवळ 25 ते 30 एकरातील ऊस आग
साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी दूरगामी धोरण आखा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पावसाळ्यापूर्वी कास तलावाच्या सांडव्याचे काम पूर्ण

बीड (प्रतिनिधी )

कृषिप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशामध्ये शेतकरी आज  हलाखीच्या परिस्थितीत जिवन जगत आहे 11 हजार रुपये क्विंटल न जाणारी सोयाबीन दहा दिवसात तीन पाच हजारावर आली, आठ महिन्यापासून तीन कृषी कायदे रद्द करा या मागणीसाठी लाखो शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत.

या आंदोलनात 700 शेतकऱ्यांनी जिव गमावला तरी सरकार दखल घ्यायला तयार नाही, कामगार कायद्यांमध्ये बदल नव्याने वीजबिल विधेयक गरिबांच्या मानगुटीवर बसणार आहे,गॅस डिझेल पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत याला जबाबदार याला कोन असा सवाल शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते भाई मोहन  गुंड यांनी केला आहे ,

कृषी कायदे च्या विरोधात असणाऱ्या देशातील पक्ष विविध संघटना यांनी 27 सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे तीन शेतकरी विरोधी कृषी विधयक वापस घ्या, विज बिल विधेयक वापस घ्या, कामगार विरोधी कामगार कायदे रद्द करा, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 2020 चा पीक विमा लागू करावा,

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ 50 हाजार मदत जाहीर करा, गॅस पेट्रोल डिझेल भाववाढ कमी करा या प्रश्नांसाठी देशभर आंदोलन होणार आहे आपण ज्या ठिकाणी असूत 

त्या ठिकाणी आंदोलनात सहभागी होऊन आपल्या शेतकरी  बापाला भावाला न्याय देण्यासाठी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे असे अहवाल शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते भाई मोहन गुंड यांनी केले आहे.

COMMENTS