शिवसेनेसोबत युती तुटल्यानंतर आता भाजपने शोधला नवा जोडीदार… ‘या’ पक्षासोबत युतीची शक्यता

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेसोबत युती तुटल्यानंतर आता भाजपने शोधला नवा जोडीदार… ‘या’ पक्षासोबत युतीची शक्यता

प्रतिनिधी : नाशिक राज ठाकरे हे नाशिकमध्ये दाखल झाले असून, ते आज नाशिक शहरासह जिल्ह्यातील शाखा अध्यक्ष्यांच्या नियुक्त्या करणार आहेत. 

पुणे, नाशिकमध्ये परीक्षा केंद्रावर गोंधळ (Video)
nashik : पोलिस आयुक्तांनी दिला खांदा
शिवसेना-राष्ट्रवादीत वाद उफाळला… थेट न्यायालयात केली याचिका दाखल

प्रतिनिधी : नाशिक

राज ठाकरे हे नाशिकमध्ये दाखल झाले असून, ते आज नाशिक शहरासह जिल्ह्यातील शाखा अध्यक्ष्यांच्या नियुक्त्या करणार आहेत. 

तसेच दिवसभर महाराष्ट्र सैनिकांचे मत जाणून घेणार आहेत. उद्या ते नाशिकमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन करतील. 

त्यानंतर या कार्यालयातच निवडणुकीबाबत नवनियुक्त शाखा अध्यक्षांचे मत जाणून घेतील. भाजपसोबत युती केल्यास पक्षाला किती फायदा होणार यावरही ते मत जाणून घेतील. 

त्यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. त्यामुळे मार्गदर्शन करताना राज ठाकरे भाजप-मनसे युतीबाबत काही मोठी घोषणा करणार का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी पुण्यात झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात लवकरच महापालिका निवडणुका होण्याचे संकेत दिले आहे. 

त्यामुळे फेब्रुवारी २०२२ मध्ये या निवडणुका होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या असून, सर्वच पक्ष आता कामाला लागले आहेत. 

अशातच मागच्या महापालिका निवडणुकीत गेलेली सत्ता पुन्हा खेचून आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नाशिकमध्ये विशेष लक्ष घालायला सुरूवात केली आहे. 

मागील दोन महिन्यात त्यांनी नाशिकचा अनेकदा दौरा केला असून, आज आणि उद्या ते नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते निवडणुकीची रणनीती ठरवणार असून, भाजपसोबत युती करण्यासंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सध्या नाशिकमधील राजकीय वातावरण बघता भाजप-मनसे युतीच्या चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान, जुलै महिन्यात राज ठाकरे हे नाशिकमध्ये आले असता त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आवर्जून भेट घेतली होती. 

जवळपास १५ मिनिटे यादोघांमध्ये चर्चा झाली होती. दोघांच्या देहबोलीवरून युतीच्या चर्चा झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. 

त्यानंतर काही दिवसातच चंद्रकांत पाटील यांनी थेट कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर भाजप-मनसे युतीच्या चर्चेला आणखी बळ मिळाले होते. 

आणि आता राज ठाकरे नाशिकला आल्यानंतर पुन्हा एकदा युतीच्या चर्चा रंगल्या असून, राज ठाकरेंच्या उद्याच्या भाषणानंतर चित्र युतीबाबतचे चित्र स्पष्ट होऊ शकते.

COMMENTS