सिंधुदुर्ग : भाजप आणि शिवसेनेतील जोरदार राडयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बंद दाराआड चर्चा झाल्यानंतर दुसर्
सिंधुदुर्ग : भाजप आणि शिवसेनेतील जोरदार राडयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बंद दाराआड चर्चा झाल्यानंतर दुसर्या दिवशी भाजपच्या विरोधाची धार कमी झाल्याचे दिसून येत आहे. शिवसेना-भाजप शत्रू नसून राजकीय विरोधक असल्याची प्रतिक्रिया शनिवारी भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली.
बंदिवान महाराष्ट्र करण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे. जन आशीर्वाद यात्रा रोखण्यासाठी जमाव बंदी लागू केली आहे. असा आरोप भाजपचे नेते अशिष शेलार यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, जमावबंदीचे आदेश हे कोणाला रोखण्यासाठी होते की, राणें वरती प्रेम करणार्या जनतेसाठी होते. जमाबंदी ही राजकीय आहे. आजच्या महाराष्ट्राचे असहिष्णूतेचे जनक हे उद्धव ठाकरे आहेत. ओबीसींच्या आरक्षणासाठी आम्ही कोणाचेही दरवाजे ठोठवू. कोणाच्याही दरवाजावर उभे राहू. ओबीसीला आरक्षण मिळण्यासाठी पक्षविरहित भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली त्यांचे कौतुक आहे. आम्ही राजकीय विरोधक आहोत. काही शत्रू नाही. हिंदुस्तान-पाकिस्तानची ही लढाई नाही. विरोधकांचा राजकीय विरोध करू. जनहितासाठी कोणत्याही दरवाजावर उभे राहू, ही भाजपची भूमिका आहे. सत्तेत बसलेल्या शिवसेनेला स्वतःला संयम, मर्यादा ठेवाव्या लागतील. काही गोष्टी सहनही कराव्या लागतील. म्हणून ते असहिष्णूतेचे जनतेचे जनक आहेत. आम्ही कुणाचे शत्रू नाहीत. राजकीय विरोधक म्हणून शिवसेनेवर सडेतोड टीका करणार. राज्याच्या हितासाठी कोणाच्याही दरवाजावर जाऊ. शिवसेना भाजप फक्त राजकीय विरोधक आहेत. शत्रू नाही. अशी प्रतिक्रिया ठाकरे- फडणवीस यांच्या भेटीवर अशिष शेलार यांनी दिली.
COMMENTS