शिवरा परिसरात ३५ महिलांच्या अंगी देवीचा संचार!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवरा परिसरात ३५ महिलांच्या अंगी देवीचा संचार!

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील एका गावाला भुताने झापाटल्याची अफवा पसरवण्यात आली आहे.

मताचे राजकारण सर्वांसाठी घातक
पुणे विद्यापीठाच्या कँटीनमध्येविद्यार्थ्यांनी घातला गोंधळ
लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक कधी ?

अमरावती/प्रतिनिधीः विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील एका गावाला भुताने झापाटल्याची अफवा पसरवण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवरा गावात हा विचित्र प्रकार घडला आहे. शिवरा गावातील पारधी समाजातील 30 ते 35 महिलांच्या अंगात एकाच वेळी देवी संचारल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

गावातील अनेक महिला आणि तरुण मुलींच्या अंगात येवू लागले आहे. या सर्व लोकांना भुताने झपाटले आहे, असे स्थानिक मांत्रिकाने सांगितल्याने सर्व वस्ती दहशतीखाली जगत आहे. एवढेच नव्हे, तर हे मांत्रिक अंधश्रद्धेतच्या प्रभावाखाली येऊन भूत उतरण्याच्या नावाखाली संबंधित महिला आणि तरुणींना अमानुष मारहाण केली जात आहे. याची माहिती पारधी समाजातील कार्यकर्ते मतीन भोसले यांना कळल्यानंतर या घटनेला वाचा फुटली आहे. भोसले यांनी या घटनेची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिली. अंनिसतर्फे डॉ. हमीद दाभोलकर, मतीन भोसले यांनी संबंधित लोकांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला; मात्र संबंधित लोकांवर याचा काहीही परिणाम झाला नाही. मांत्रिकाच्या सांगण्यावरून या गावातील लोकांनी भूत उतरवण्यासाठी दुसऱ्या दिवशी विठोबा सावंगी हे ठिकाण गाठले आहे. हे ठिकाण अंगातील भूत उतरवण्यासाठी ओळखले जाते. एकाच वेळी गावातील 30 ते 35 लोकांच्या अंगात येत असल्याने संबंधित प्रकार पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित घटनेची माहिती अमरावती ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांना दिली आहे. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी येताना पाहून अंगात येणाऱ्या लोकांनी आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या मांत्रिकाने पळ काढला आहे. या गावात यापूर्वी नरबळीसारखे गंभीर गुन्हे घडले आहेत. त्यामुळे आणखी एका नवीन प्रकारामुळे गावात दहशत पसरली आहे. त्यामुळे संबंधित लोकांवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी दाभोलकर आणि भोसले यांनी केली आहे.

COMMENTS