लोणंद, ता. खंडाळा येथील बोल्ट दि जिमचे मालक मनोज चव्हाण यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून लोणंद ते प्रतापगड 110 किलोमीटर इतके अंतर सायकलची राइड करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे.
लोणंद / वार्ताहर : लोणंद, ता. खंडाळा येथील बोल्ट दि जिमचे मालक मनोज चव्हाण यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून लोणंद ते प्रतापगड 110 किलोमीटर इतके अंतर सायकलची राइड करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. हे अंतर त्यांनी 5 तास 7 मिनिटांत पूर्ण केले असून प्रत्येक तासाला 21 किलोमीटर इतके अंतर हे त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रेरणादायी उपक्रमाचे विशेष कौतुक नागरिकांकडून करण्यात येत आहे. यावेळी या उपक्रमासाठी किरण गायकवाड आणि अमित डिसले यांनी मनोज चव्हाण यांना मोलाची साथ दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी मनोज चव्हाण यांनी ऊन, वारा, पाऊस, धुके, घाट, वेडी वाकडी वळणे यांचा सामना केल्याने या उपक्रमाबद्दल विशेष कौतुक केले जाते आहे. सकाळी साडे सहा वाजता लोणंद येथून या उपक्रमास सुरुवात होत असताना शिरवळ मार्गे हा प्रवास सुरु करण्यात आला होता. खंडाळा घाट खूप विचित्र, उलटं वारे आणि तो भयानक चढ आणि घाटाची ऊंची समुद्र सपटीपासून 900 मीटर असतानाही अशा घाटात चारचाकी नीट चढायचे कठीण आणि अशा कठीण समयी सुध्दा सायकल चढवत पुढे जाण्याचा प्रयत्न मनोज चव्हाण यांनी केला.
खंडाळा घाट उतरून वाईच्या दिशेने केंजळ मार्गे सुरुर फाट्यावरून वाई पास केले. 1300 मीटर ऊंच समुद्र सपटीपासून असलेल्या पसरणी घाटात ही सायकलिंग यशस्वी पार केले. महाबळेश्वर आंबेनळी घाटाला, तीव्र उतार, भयानक दर्या, कोसळलेल्या
दर्या, थंड हवेची झुळूक, घनदाट धुक आणि वरून पडणारा पाऊस अशा परिस्थितीतही मनोज चव्हाण यांनी त्यांच्या सोबत प्रेरणादायी साथ देणारे किरण गायकवाड आणि अमित डिसले हे अधूनमधून प्रतापगड गाठायचाच होता. प्रतापगड 4 किमी राहिला होता पुसट पुसट धुक्यातून तो भगवा मात्र दिसत असताना पुढे मात्र पोलिसांनी बरोबर प्रतापगडाच्या अगोदर 200 मीटरवर छावणी घातली होती. जिल्हा बंदी घातली होती. खडतर प्रवास, कठोर परिश्रम, अडचणीतून इथपर्यंत आलेला प्रवास आता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन कसे करायचे हा प्रश्न उपस्थित राहिला होता. मनोज चव्हाण अगदी स्तब्धच राहिले होते. किरण गायकवाड आणि अमित डिसले यांनी गाडीतून उतरून पोलिसांना विनंती केली असता या उपक्रमाबद्दल ही पोलिसांना कुतूहल वाटले. फक्त दोघांनाच पुढे जाण्याची संधी देण्यात आली. ज्या मनोज चव्हाण यांनी हा उपक्रम हाती घेतला होता. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करता आले. 110 कि.मी. सायकल राइड करणारा प्रवास खडतर असाच अनुभव हा 5 तासात पूर्ण केल्याने मनोज चव्हाण यांनी स्वतः समाधान व्यक्त केले आहे
दरम्यान, मनोज चव्हाण यांना प्रतापगडावर जाता यावे म्हणून किरण गायकवाड आणि अमित डिसले यांनी मोलाची साथ तर दिली. पोलिसांना त्यांनी विनंती केली. यावर पोलिसांनी प्रतापगडावर अमित आणि मनोज या दोघांना सोडले होते.
COMMENTS