शिक्षक बँक सत्ताधार्‍यांनी 24 कोटींचा हिशेब लपवला ; गुरुमाऊलीच्या एका गटाचा आरोप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षक बँक सत्ताधार्‍यांनी 24 कोटींचा हिशेब लपवला ; गुरुमाऊलीच्या एका गटाचा आरोप

नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतील सत्ताधार्‍यांनी आगामी वर्षातील बँकेचे उत्पन्न 103 कोटी रुपये दाखवले असून, खर्च 79 कोटीचा दाखवला आहे.

पळणारे तीन आरोपी पकडले…त्यांच्याकडे तीन गावठी कट्टे सापडले
विखे पाटील यांच्या पन्नास वर्षाच्या सत्तेला लागला सुरुंग
क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा फुले यांना भारतरत्न द्या : माधवराव तिटमे

अहमदनगर/प्रतिनिधी-नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतील सत्ताधार्‍यांनी आगामी वर्षातील बँकेचे उत्पन्न 103 कोटी रुपये दाखवले असून, खर्च 79 कोटीचा दाखवला आहे. यातून सुमारे 24 कोटीचा हिशेब लपवला गेला आहे, असा आरोप गुरुमाऊली मंडळाच्या एका गटाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे यांनी शनिवारी केला. बँकेच्या सत्ताधार्‍यांनी ताळेबंदातील या 24 कोटीच्या फरकाचा हिशेब द्यावा व सुधारित ताळेबंद सादर करावा आणि मग बँकेची वार्षिक सभा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. बँकेने रविवारी वार्षिक सभा घेतली तर सहकार न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला. 

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सभा रविवारी 28 रोजी सकाळी साडेदहा वाजता ऑनलाईन होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शनिवारी विकास मंडळाची वार्षिक सभा झाली. त्याआधी पत्रकारांशी डावखरे व प्रवीण ठुबे यांनी संवाद साधला. यावेळी राज्य शिक्षक परिषदेचे संपर्क प्रमुख रावसाहेब रोहोकले, संजय शेळके, संजय शिंदे, आर. पी. रहाणे, गोरक्ष देशमुख, भाऊसाहेब ढोकरे, सुनंदा आडसूळ, अविनाश निंभोरे, राजेंद्र झावरे, राजेंद्र ठुबे, संजय दळवी आदींसह अन्य उपस्थित होते.

 त्या संचालकांसमोर ढोलबजाव

बँकेच्या वार्षिक अहवालात ताळेबंदात दिसणारा 24 कोटीचा घोळ नेमका काय आहे, हे सत्ताधार्‍यांनी स्पष्ट करावे व तोपर्यंत वार्षिक सभा तहकूब करावी, अशी मागणी डावखरे व ठुबे यांनी केली. तसेच बँकेचे कार्यक्षेत्र राज्य करण्याबाबतची पोटनियम दुरुस्ती सत्ताधार्‍यांनी केली तर 15 दिवसांनी बँकेच्या 14 संचालकांच्या दारापुढे आम्ही ढोल-बजाव आंदोलन करणार आहोत, असे ते म्हणाले. सत्ताधारी गुरुमाऊली मंडळातील 7 संचालकांनी या पोटनियम दुरुस्तीला विरोध केला आहे. त्यामुळे त्यांना वगळून अन्य संचालकांच्या घरासमोर आंदोलन करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विकास मंडळाद्वारे लालटाकीवरील गुरुकुल इमारतीच्या मागे विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह करण्यात येत आहे व यासाठी ऐच्छीक दहा हजार रुपयांच्या ठेवी देण्याचा ठराव झाला असताना केवळ विकास मंडख व बँक प्रशासनात तसा करार झाला नसल्याचे कारण देऊन ठेवी देण्यास सत्ताधार्‍यांनी नकार दिल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. विकास मंडळाचे 1985 ते 92पर्यंतचेच चेंज रिपोर्ट दिले गेले आहेत, त्यानंतरचे दिलेच नव्हते. मात्र, गुरुमाउली मंडळाने मागील 30 वर्षांचे चेंज रिपोर्ट तयार केले तसेच पूर्वीची इमारत व गुरुकुलमधील गाळे भाडे वसुली पारदर्शी करून ती 14 लाख रुपयापर्यंत म्हणजे दुप्पट वाढवली, असा दावाही यावेळी करण्यात आला.

COMMENTS