शिक्षक दिनी भारतीय स्टेट बँकेकडून सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षक दिनी भारतीय स्टेट बँकेकडून सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान

प्रतिनिधी : नगरभारतीय स्टेट बँकेच्या वतीने यंदाच्या वर्षी स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव वर्ष’ साजरा करण्यात येत आहे

विवेक कोल्हे यांचा नाशिक शिक्षक मतदार संघातून अपक्ष अर्ज
कांदा रस्त्यावर ओतून शेतकर्‍यांचा संताप
वडगाव गुप्ता येथे युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने जनसुरक्षा अभियान संपन्न

प्रतिनिधी : नगर
भारतीय स्टेट बँकेच्या वतीने यंदाच्या वर्षी स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव वर्ष’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त बँकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.

60व्या शिक्षक दिनानिमित्त भारतीय स्टेट बँकेच्या नगर शाखेत सेवानिवृत्त शिक्षक मुकुंद रसाळ, दिलीप जिनसीवाले, सतीश रायबागकर, राजाराम घोडके, रजनी घोडके आदींना सन्मानित करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय स्टेट बँकेच्या नगर शाखेचे मुख्य प्रबंधक अजय कुमार होते. कार्यक्रमास उपप्रबंधक दीपक लिमकर व प्रवीण दळवी, वरद दळवी, बँकेचे अधिकारी संतोष कांदे, दीपक चडोकर, राघवेंद्र वेळणीकर, महेश पंडित, रुपाली गुळवेलकर, शुभम वनारसे आदी उपस्थित होते.

यावेळी शिक्षकांनी समायोचित मार्गदर्शन केले. बँकेचे अधिकारी व वरद दळवी यांनी शिक्षकांच्या गौरवपर भाषण केले. उपप्रबंधक दीपक लिमकर यांनी सूत्रसंचालन केले, तर स्वाती गुळवेलकर यांनी आभार मानले.

COMMENTS