जामखेड प्रतिनिधी शिक्षक काँलनीतुन टाकत असलेली विजेची नवीन मेनलाईन धोकादायक ठरू शकते. नागरिकांच्या जीवीतास धोकादायक ठरणारया लाईनचे काम थांबवा अन्य
जामखेड प्रतिनिधी
शिक्षक काँलनीतुन टाकत असलेली विजेची नवीन मेनलाईन धोकादायक ठरू शकते. नागरिकांच्या जीवीतास धोकादायक ठरणारया लाईनचे काम थांबवा अन्यथा मुलाबाळांसह महावितरण कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
आमदार रोहित पवार, कार्यकारी अभियंता महावितरण जामखेड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिक्षक काँलनीतुन विजेच्या नवीन मेनलाईनचे पोल टाकण्याचे काम सुरू आहे. रहिवाशांना ११ हजार मेगावॉट व्होल्टेजच्या लाईनमुळे धोका आहे. अशी लाईन एका भागातून काढुन दूसरया भागातून घेऊन जात आहात. तेथेही म्हणजे दोन्ही बाजूला ५०पेक्षा जास्त कुटुंब राहतात मोठ्या प्रमाणावर नागरिकच राहतात.
काही लोकांच्या लाभापोटी संबंधित हे बळजबरीने लाईनचे पोल टाकत आहेत. मानवी वस्तीतुन गेलेल्या लाईनमुळे दोन वर्षापुर्वी जामखेडमध्ये एका व्यक्तीला शाँक लागुन कायम अपंगत्व आले आहे. अशा अनेक घटना घडल्या आहेत. तरी भविष्यात आम्हा रहिवाश्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो. आम्हा रहिवाशांना कसल्याही सुचना दिल्या नाहीत. विश्वासात घेतले नाही.
तरी सदर लाईनचे काम थांबवून दूसरीकडुन पर्याय उपलब्ध करावा अन्यथा आम्ही सर्व रहिवाशी उपोषणाला बसणार आहोत असे निवेदनात म्हटले आहे . निवेदनावर उमेश खुपसे, सुनिता गंडाळ, अश्विनी गंडाळ, सचिन नंदिरे,रविंद्र शेळके, यज्ञकांत जगदाळे, शहाजी जाधव, तांबे मेजर, नन्नवरे मेजर, सुग्रीव पिसाळ, प्रकाश नागरगोजे, नानासाहेब मोरे, खंडू कांबळे यांच्यासह शेकडो रहिवासी नागरिकांच्या सह्या आहेत.
COMMENTS