शिक्षकांनी सर्वोत्कृष्ट बनून विद्यार्थ्यांच्या मनात जिद्द निर्माण केली पाहिजे : डॉ.सर्जेराव निमसे

Homeताज्या बातम्याअहमदनगर

शिक्षकांनी सर्वोत्कृष्ट बनून विद्यार्थ्यांच्या मनात जिद्द निर्माण केली पाहिजे : डॉ.सर्जेराव निमसे

नगर : प्रतिनिधीदेशाला विश्वगुरु बनवायचे असेल तर फक्त योजना आखून उपयोग नाही. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अतिशय उत्तम असून त्याची प्रभावी अंमलबजावणी

सर्वोदयाच्या तीन कुस्ती मल्लांची राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड
आमदार निलेश लंकेच्या आंदोलनास पाथर्डीत संमिश्र प्रतिसाद
आमदारांनीच दिला महापालिकेत धरणे आंदोलन करण्याचा इशारा

नगर : प्रतिनिधी
देशाला विश्वगुरु बनवायचे असेल तर फक्त योजना आखून उपयोग नाही. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अतिशय उत्तम असून त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली तर भारतातील उच्च शिक्षण नक्कीच जागतिक दर्जाचे होईल. हे करताना शिक्षण क्षेत्राला संपूर्ण स्वायत्तताही मिळायला हवी. शिक्षण व्यवस्थेत सुधारणांमध्ये शिक्षकाची भूमिकाही महत्त्वाची आहे.

चांगला शिक्षक हा त्याच्या वर्तणुकीने समाजात आदर्श निर्माण करतो. तर उत्कृष्ट शिक्षक मुलांच्या मनात ध्येयाप्रती जिद्द निर्माण करतो. असे सर्वोत्कृष्ट शिक्षक मिळाल्यानेच महनीय व्यक्तीमत्त्व घडली आहेत हा इतिहास आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने सर्वोत्कृष्ट शिक्षक व्हायचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.सर्जेराव निमसे यांनी केले..

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल व माळीवाडा येथील गोरे डेन्टल क्लिनिकच्यावतीने आदर्श शिक्षक कै.तुकाराम गोरे गुरुजी स्मृती प्रित्यर्थ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरु डॉ.निमसे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रोटरीचे सहायक प्रांतपाल दादासाहेब करंजुले, संजय गारुडकर, रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष ईश्वर बोरा, सेक्रेटरी डॉ.दिलीप बागल, डॉ.सुदर्शन गोरे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक ईश्वर बोरा यांनी केले. स्वागत करताना डॉ.गोरे म्हणाले की, समाज घडविण्याचे खरे काम शिक्षकांकडूनच होते. त्यामुळे प्रत्येकानेच शिक्षकांप्रती कायम ऋणी राहिले पाहिजे. कै.तुकाराम गोरे गुरुजी हे आदर्श शिक्षक म्हणून परिचित होते. त्यांच्याच स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी गुणवंत शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करताना वेगळाच आनंद मिळतो.

दादासाहेब करंजुले म्हणाले की, शिक्षक हा समाजासाठी अनमोल असतो. समाज त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहत असतो. त्यामुळे शिक्षकांना आपली वर्तणूक नेहमीच उत्तम ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांना शिकवताना दोन्ही बाजूंनी संवाद असायला हवा म्हणजे त्यांना शिकवलेले व्यवस्थित कळेल. मी स्वत: शिक्षक असल्याने अशा कार्यक्रमास उपस्थित राहता आले याचा आनंद वाटतो.

संजय गारुडकर यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा देत रोटरी नेहमीच शिक्षकांप्रती आदर व्यक्त करणारे उपक्रम राबवित असल्याचे सांगितले. यावेळी पुरस्कारप्रास्त शिक्षकांनीही मनोगत व्यक्त करीत रोटरी सेंट्रल व डॉ.गोरे यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नांगरे यांनी केले तर आभार डॉ.दिलीप बागल यांनी मानले.

COMMENTS