शासकीय कोरोना तपासणी केंद्रातील वेळेची मर्यादा हटवावी- सौ कोल्हे

Homeअहमदनगर

शासकीय कोरोना तपासणी केंद्रातील वेळेची मर्यादा हटवावी- सौ कोल्हे

कोविड रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रूग्णालयामध्ये विविध टेस्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

श्रीरामपूर शहरातून आरोग्य दिनानिमित्त वॉकेथॉन रॅली
पाथर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ; ५७ लाखाचा गांजाचा अमली पदार्थ जप्त..
पोलिसांच्या निवडणुकीत चक्क जय श्रीराम पॅनेल

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोविड रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रूग्णालयामध्ये विविध टेस्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.परंतु टेस्ट करण्याच्या वेळेची मर्यादा असल्याने संशयीत रूग्ण टेस्ट करण्यापासून वंचित राहतात,दुस-या दिवसाची वाट पहाणेपर्यंत अनेकांच्या संपर्कात येउन संसर्ग पसरला जातो,त्यामुळे टेस्ट करण्याच्या वेळा वाढविण्यात याव्या.तसेच एचआरसीटी करण्यासाठी आकारण्यात येणारी तपासणी फिची रक्कम जास्त असून सदर चाचणी वारंवार करावी लागत असल्याने आर्थीक स्थितीही कोलमडत आहे.त्यामुळे रूग्णांना सदरची तपासणी कमी दरामध्ये उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव,माजी आमदार सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे यांचेकडे केली आहे.
आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांना पाठविलेल्या निवदेनात सौ.कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की,सध्या कोविड रूग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत असुन रॅपीड टेस्ट करण्यासाठी गर्दी वाढत आहे.रूग्णालयामध्ये सुरू असलेल्या या टेस्टच्या वेळा मर्यादित ठेवण्यात आलेल्या आहे. त्यामुळे रांगेत उभे राहुन टेस्ट न झाल्यामुळे  वंंचित राहतात, टेस्टसाठी दुस-या दिवसाची वाट पहात घरी थांबतात,असे अनेक रूग्ण असल्याने ते इतरांच्या संपर्कात येउन कोरोनाचा संसर्ग वाढत जातो.त्यामुळे या तपासणीच्या वेळेमध्ये वाढ करण्याची गरज आहे, त्यामुळे रूग्णवाढीला आळा बसण्यास निश्चितच मदत होणार आहे. त्याचप्रमाणे या आजारासाठी एचआरसीटी तपासणी करण्याची वारंवार गरज पडते,या तपासणीची फी जास्त प्रमाणात असल्यामुळे अगोदरच विवंचनेत असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.याकरीता सदरची तपासणी फीची रक्कम कमी करण्यात यावी, अशी मागणी सौ.कोल्हे यांनी केली आहे.

COMMENTS