शाळांमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करुन कोरोना प्रतिबंधक साधनसुविधा पुरविण्याची शिक्षक परिषदेची मागणी

HomeUncategorized

शाळांमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करुन कोरोना प्रतिबंधक साधनसुविधा पुरविण्याची शिक्षक परिषदेची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)-राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेत असताना शाळांमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करुन कोरोना प्रतिबंधक साधनसुविधा उपलब्ध करून देण्याची

ओबीसी आरक्षण वगळून निवडणुका झाल्यास मतदानावर बहिष्कार : नंदकुमार कुंभार
इस्लामपूर काँग्रेस कार्यालयाच्या मालकी हक्काचा वाद शरद पवारांच्या कोर्टात
स्वच्छता सर्वेक्षणात नगर राज्यात दुसरे व देशात 32 वे

अहमदनगर (प्रतिनिधी)-
राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेत असताना शाळांमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करुन कोरोना प्रतिबंधक साधनसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्याध्यक्ष आनंद शर्मा, कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी पाठविले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
दि.24 सप्टेंबरच्या शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. यानुसार शाळांमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करणे, विद्यार्थ्यांचे तापमान मोजणे, शाळा निर्जंतुकीकरण करणे, मुलांच्या नियमित तपासणी करीता डॉक्टर, पालक व परिचारिकांची मदत घेणे तसेच याकरिता आर्थिक मदत म्हणून औद्योगिक कंपनीच्या सीएसआर फंडाची मदत घेण्याबाबत सूचना केलेल्या आहेत. सर्वच शाळा या सुविधा उपलब्ध करून देऊ शकत नाहीत. सीएसआर फंड देखील एवढ्या कमी वेळेत व सहज मिळवता येत नाही. अनेक शाळांचे मुख्याध्यापक व संस्थाचालकांनी याबाबत असमर्थता दाखविली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
दोन ते चार शाळांसाठी मनपाच्या आरोग्य विभागाच्या मदतीने हेल्थ क्लिनिक सुरू करावे, मुंबई महापालिकेच्या धर्तीवर खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत मास्क व सॅनीटायझर देण्याची सोय करण्यात यावी, आवश्यक साधने खरेदी करुन शाळा मधील दररोजची कोरोना प्रतिबंधक कामे करण्यासाठी तात्काळ विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, शाळांमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करावे व शाळांना विशेष आर्थिक मदत देण्याबाबत निर्णय घेण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, राज्य महिला आघाडी प्रमुख पुजाताई चौधरी, नरेंद्र वातकर, किरण भावठाणकर, माजी अध्यक्ष बाबासाहेब काळे, माजी आमदार भगवान अप्पा साळुंखे, संजीवनीताई रायकर, प्रा. सुनिल पंडित आदी राज्य कार्यकारणी सदस्य प्रयत्नशील आहेत.

COMMENTS