शाडू मातीच्या पर्यावरणपुरक श्रीगणेशाचे चौकात बनविलेल्या कुंडात विसर्जन

Homeअहमदनगरराजकारण

शाडू मातीच्या पर्यावरणपुरक श्रीगणेशाचे चौकात बनविलेल्या कुंडात विसर्जन

नगर –  पर्यावरणपुर्वक शाडूमातीचे गणपतीची प्रतिष्ठापना आज घरोघरी केली जात आहे. आता सार्वजनिक मंडळांनीही  शाडूमातीच्या श्रीगणेशाची प्रतिष्ठापना व्हावी, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशाचे विघटन होत नसल्याने विसर्जनानंतर मुर्ती भंग पावतात. त्यामुळे पुढील काळात शाडू मातीच्याच श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करावी. श्री शिवगर्जना प्रतिष्ठानच्यावतीने शासनाच्या नियमांचे पालन करत चार फुटीच शाडू मातीची श्री गणेशाची प्रतिष्ठापना करुन तिचे विसर्जन जागेवरच कुंड तयार करुन केले, हे इतर मंडळासाठी प्रेरणादायी आहे. कोरोना नियमांचे पालन करत प्रतिष्ठानने 10 दिवस धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवून आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांनी केले.      माणिक चौक येथील श्री शिवगर्जना प्रतिष्ठानच्या चार फुटी शाडू मातीच्या पर्यावरणपुरक श्रीगणेशाची चौकात बनविलेल्या कुंडात विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी महापौर सौ.रोहिणी शेंडगे, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, मंडळाचे अध्यक्ष विशाल वालकर, मूर्तीकार किशोर रोकडे, उमेश शिर्के, तारिक कुरेशी ,गणेश दहिंडे, दादासाहेब बाबर, प्रतिक बोगावत, पराग परदेशी, प्रणय चोरडिया, शाम भुमकर, गिरिष हंडे, रोहित बोथरा, विकी कबाडे, विनायक जाधव आदि उपस्थित होते.      याप्रसंगी विशाल वालकर म्हणाले, श्री शिवगर्जना प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असतो. परंतु गेल्या वर्षीपासूनच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात प्रथमच चार फुटी  शाडू मातीच्या श्री गणेशाची स्थापना करुन जागेवरच विधीवत विसर्जन केले आहे. या मुर्तीची स्थापना व विसर्जन करण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. गेल्या दहा दिवस धार्मिक व सामाजिक कामांना प्राधान्य देऊन कोरोनाबाबत जनजागृती केली. प्रतिष्ठान वर्षभर गणेशोत्सवाबरोबरच सामाजिक कार्यात सहभागी होत असते. कोरोना काळात गरजूंना मदत करुन परिसरातील नागरिकांचे लसीकरणासाठी मंडळाचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.      याप्रसंगी  दिलीप सातपुते,  विक्रम राठोड आदिंनी शिवगर्जना प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात येणार्‍या उपक्रमांचे कौतुक केले. याप्रसंगी मुर्तीकार किशोर रोकडे यांचा शाडूमातीच्या श्रीगणेशाची सुंदर मुर्ती बनविलेल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

डॉ. तनपुरे कारखाना उस गाळप हंगामासाठी सज्ज
विद्यार्थी प्रगत तर राष्ट्र प्रगत: महापौर रोहिणी ताई शेंडगे
आमदार संग्राम जगतापांना झोपेतही माझा चेहरा दिसतो… किरण काळेंचा घणाघात

नगर – 

पर्यावरणपुर्वक शाडूमातीचे गणपतीची प्रतिष्ठापना आज घरोघरी केली जात आहे. आता सार्वजनिक मंडळांनीही  शाडूमातीच्या श्रीगणेशाची प्रतिष्ठापना व्हावी, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशाचे विघटन होत नसल्याने विसर्जनानंतर मुर्ती भंग पावतात. त्यामुळे पुढील काळात शाडू मातीच्याच श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करावी. श्री शिवगर्जना प्रतिष्ठानच्यावतीने शासनाच्या नियमांचे पालन करत चार फुटीच शाडू मातीची श्री गणेशाची प्रतिष्ठापना करुन तिचे विसर्जन जागेवरच कुंड तयार करुन केले, हे इतर मंडळासाठी प्रेरणादायी आहे. कोरोना नियमांचे पालन करत प्रतिष्ठानने 10 दिवस धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवून आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांनी केले.

     माणिक चौक येथील श्री शिवगर्जना प्रतिष्ठानच्या चार फुटी शाडू मातीच्या पर्यावरणपुरक श्रीगणेशाची चौकात बनविलेल्या कुंडात विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी महापौर सौ.रोहिणी शेंडगे, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, मंडळाचे अध्यक्ष विशाल वालकर, मूर्तीकार किशोर रोकडे, उमेश शिर्के, तारिक कुरेशी ,गणेश दहिंडे, दादासाहेब बाबर, प्रतिक बोगावत, पराग परदेशी, प्रणय चोरडिया, शाम भुमकर, गिरिष हंडे, रोहित बोथरा, विकी कबाडे, विनायक जाधव आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी विशाल वालकर म्हणाले, श्री शिवगर्जना प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असतो. परंतु गेल्या वर्षीपासूनच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात प्रथमच चार फुटी  शाडू मातीच्या श्री गणेशाची स्थापना करुन जागेवरच विधीवत विसर्जन केले आहे. या मुर्तीची स्थापना व विसर्जन करण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. गेल्या दहा दिवस धार्मिक व सामाजिक कामांना प्राधान्य देऊन कोरोनाबाबत जनजागृती केली. प्रतिष्ठान वर्षभर गणेशोत्सवाबरोबरच सामाजिक कार्यात सहभागी होत असते. कोरोना काळात गरजूंना मदत करुन परिसरातील नागरिकांचे लसीकरणासाठी मंडळाचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

     याप्रसंगी  दिलीप सातपुते,  विक्रम राठोड आदिंनी शिवगर्जना प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात येणार्‍या उपक्रमांचे कौतुक केले. याप्रसंगी मुर्तीकार किशोर रोकडे यांचा शाडूमातीच्या श्रीगणेशाची सुंदर मुर्ती बनविलेल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS