शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे पॅचिगकाम चालू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे पॅचिगकाम चालू

अहमदनगर (प्रतिनिधी) -  अहमदनगर शहरातून जाणाऱ्या एन.एच-222 राष्ट्रीय महामार्गावरील खड्डयांचे काम त्वरित सुरू करण्यासाठी शहर राष्ट्रवादी आक्रमक झाली

जाामखेड शहर अस्वच्छतेच्या विळख्यात
नगरमध्ये व्यापार्‍यांनी बंद पाळून जीएसटीचा केला निषेध
बँकांतील संशयास्पद व्यवहारांवर विशेष लक्ष द्यावे

अहमदनगर (प्रतिनिधी) – 

अहमदनगर शहरातून जाणाऱ्या एन.एच-222 राष्ट्रीय महामार्गावरील खड्डयांचे काम त्वरित सुरू करण्यासाठी शहर राष्ट्रवादी आक्रमक झाली असुन. नगर शहरातील सक्कर चौक ते काटवन खंडोबा चौक ते अमरधाम मार्गे नेप्ती नाका ते कल्याण रोड उड्डाणपूल पर्यंत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असुन. 

या रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले असून नागरिकांना वाहने चालवताना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते. रस्त्यावर झालेल्या छोट्या- मोठ्या खड्ड्यांमुळे याठिकाणी अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या रस्त्यावरच मंगल कार्यालय, हॉस्पिटल, महाविद्यालय, भाजी मंडई, अमरधाम तसे छोटे मोठे उपनगर सदरच्या रस्त्यालगत आहे. त्यामुळे या रस्त्यावर नागरिकांची व वाहनांची वर्दळ असते. 

त्यामुळे सदरचा रस्ता तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे.  त्यामुळे खड्डे पॅचिंग चे काम त्वरित चालू करावे अन्यथा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग कार्यालय या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा निवेदनाद्वारे युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांनी  दिला होता सदर रस्त्याचे काम चालू करण्यात आले आहे या कामाची पाहणी करताना शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते सर, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे,प्रा अरविंद शिंदे, युवकचे सरचिटणीस गजेंद्र दांगट, युवराज शिंदे, राम वाघ, शहेबाझ शेख दारुवाला आदी पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS