व्यावसायिक एलपीजी सिलेंडर’ 266 रुपयांनी महागले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यावसायिक एलपीजी सिलेंडर’ 266 रुपयांनी महागले

नवी दिल्ली : व्यावसायिक एलपीजी सिंलेंडरच्या दरात आज, सोमवारी 266 रुपयांची वाढ करण्यात आलीय. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसाम

अज्ञात वाहनाच्या धडकेने दोघांचा मृत्यू
रेड्डी यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : चित्रा वाघ
वसमत येथील उपोषणास चळवळीतील सर्व पक्षीय संघटनेचा पाठिंबा

नवी दिल्ली : व्यावसायिक एलपीजी सिंलेंडरच्या दरात आज, सोमवारी 266 रुपयांची वाढ करण्यात आलीय. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वापराचा 19 किलो वजनाचा सिलेंडर पूर्वी 1734 रुपयांना मिळत असे. आजपासून त्याचे दर दोन हजार रुपये झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात तेल कंपन्यांनी सबसिडी फ्री 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 15 रुपयांनी वाढवली होती. राजधानी दिल्लीमध्ये 19 किलो वजनाच्या कमर्शिअल सिलिंडरची किंमत 1734 रुपयांवरुन 2000.50 रुपये इतकी झाली आहे. मुंबईमध्ये 1683 रुपयांना मिळणारा कमर्शिअल सिलिंडर आता 1950 रुपयांना मिळेल. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये 19 किलो वजनाचा कमर्शिअल सिलिंडर 2073.50 रुपयांना झालाय. चेन्नईमध्ये कमर्शिल गॅसची किंमत देशात सर्वाधिक आहे. चेन्नईमध्ये 19 किलो वजनाचा सिलिंडर घेण्यासाठी 2133 रुपये मोजावे लागतील.

COMMENTS