वैष्णवदेवी बालमित्रांनी साकारली किल्ल्याची प्रतिकृती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वैष्णवदेवी बालमित्रांनी साकारली किल्ल्याची प्रतिकृती

नगर -  विनायकनगर येथील वैष्णवदेवी बाल मित्र मंडळाच्या मुलांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर किल्ल्याची प्रतिकृती बनविण्यात आली. किल्ला बनविण्यासाठी दिनेश

कर्जतच्या ’तहसील’मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेशाची पायमल्ली
चारित्र्यावर संशय घेवून पत्नीला मारहाण
आंब्यांची आवक वाढली व भावही घसरले

नगर – 

विनायकनगर येथील वैष्णवदेवी बाल मित्र मंडळाच्या मुलांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर किल्ल्याची प्रतिकृती बनविण्यात आली. किल्ला बनविण्यासाठी दिनेश शिंगवी, अभिनंदन गुंदेचा, भावेश गांधी, विश्वजीत धोंडे, दर्शन भंडारी, सोहम वडे, राहुल चौधरी यांनी परिश्रम घेतले. तर सौ.मनिषा पारस गुंदेचा यांचे सहकार्य लाभले आहे.

     हा किल्ला 5 बाय 6 फूट असून 4 फूट उंचीचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती ठेवण्यात आली असून, किल्यात 740 मावळे, प्राणी संग्राहलय, शामियाना, आखाडा, धरण, बाजारपेठ, तटबंदी, तरवाजा, तोफगोळे, बुरुजांची आकर्षक मांडणी केली आहे.

     हा किल्ला पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहे. या मुलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS