वृक्षारोपण करू या, पर्यावरणाचे रक्षण करून मानवी जीवन सुरक्षित करू या : सनी वाघ

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

वृक्षारोपण करू या, पर्यावरणाचे रक्षण करून मानवी जीवन सुरक्षित करू या : सनी वाघ

निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्‍या भावनेतून प्रत्‍येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्‍यासाठी आपापल्‍या परिसरात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जतन करणे ही काळची गरज असल्याचे प्रतिपादन कोपरगाव शहर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सनी वाघ यांनी केले.

मनोधैर्य योजनेने दिला महिलांना आधार ; जिल्ह्यातील 109 पीडितांना पावणे दोन कोटी रुपयांचे अर्थसाह्य
सहकर पॅनलचे जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल
ग्रामपंचायत निवडणुकीत काळे गटाने उघडले खाते

कोपरगाव शहर प्रतिनिधी- निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्‍या भावनेतून प्रत्‍येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्‍यासाठी आपापल्‍या परिसरात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जतन करणे ही काळची गरज असल्याचे प्रतिपादन कोपरगाव शहर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सनी वाघ यांनी केले.

कोपरगाव शहर शिवसेना व युवा सेना च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे  पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री, युवासेनाप्रमुख आदित्यजी  ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त शहरातील विविध परिसरात वृक्षारोपण केले त्याच बरोबर कोकमठाण येथील गोकुळधाम गौरक्षा केंद्रामध्ये घास वाटप, ग्रामीण रुग्णालय मधील रुग्णांना फळ वाटप बरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवुन वाढदिवसाजरा करण्यात आला त्याप्रसंगी शिवसेना मा.शहरप्रमुख सनी वाघ बोलत होते.
श्री. सनी वाघ बोलतांना म्हणाले की, वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण, कार्बन डायॉक्साईडचे, उत्सर्जन, जंगलाचा ह्रास, जंगलातील वणवे, वाढते तापमान यामुळे निसर्गाचा समतोल ढासळला. त्यामुळे अनेक पाऊस, भूकंप, त्सुनामी विविध प्रकारची वादळे अशी अनेक संकटे येत आहेत. या संकटांना राखण्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणे ही सध्या काळाची गरज आहे. वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली आहे. स्वच्छ, शुद्ध व ताजी हवा राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाचे आहेत. ऑक्सिजन देणार्‍या झाडांची देखील युवासेनेच्या माध्यमातून संपूर्ण शहरामध्ये लागवड करण्यात येणार आहे तसेच लागवड झाल्यानंतर ही झाडे जगविण्यासाठी सुद्धा शिवसेना व युवा सेना काम करणार असल्याचे शेवटी सनी वाघ म्हणाले.  राबविण्यात आलेल्या उपक्रम प्रसंगी शिवसेना मा.शहरप्रमुख सनी रमेश वाघ, सुनिल भैय्या तिवारी युवासेना सहसचिव , विस्तारक, नगरसेवक अनिल आव्हाड, शिवसेना ग्रा.सं.कक्ष शहरप्रमुख रविंद्र कथले, शिवसेना उपशहरप्रमुख बालाजी गोर्डे, अमोल शेलार, संतोष जाधव, कुणाल लोणारी, शिवसेना शहर संघटक सनी काळे, वसिम चोपदार, अमित बांगर, युवासेना उपजिल्हाप्रमुख गणेश जाधव, युवासेना तालुका प्रमुख सिद्धार्थ शेळके, युवासेना शहरप्रमुख नितिष बोरुडे, युवासेना शहर चिटणीस आशिष निकुंभ, अभिषेक सारंगधर, युवासेना उपशहरप्रमुख रुशी धुमाळ, शिवम नागरे, मयुर फुकटे, युवासेना उपतालुकाप्रमुख विजय भोकरे, अक्षय गुंजाळ, प्रशांत बोरावके, गणेश घुगे, शिवसेना शाखाप्रमुख दिपक कराळे, विशाल औटी, राहुल साटोटे आदि शिवसैनिक उपस्थित होते. याच विशेष दिनी कोपरगाव येथील  शिवसैनिक ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख रवी  कथले,  आशिष निकुंभ, पप्पू बागड, निखिल जोशी यांचा वाढदिवस शहर शिवसेना युवा सेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.

COMMENTS